Hockey World Cup, IND vs PAK: भारत-पाकिस्तान १६ वर्षांनी आमने-सामने! दोन्ही संघांसाठी 'करो वा मरो' सामना, कुठे अन् कधी पाहाणार?

Hockey World Cup, India vs Pakistan Live Streaming: हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान बुधवारी होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असून कुठे आणि कधी पाहाणार, जाणून घ्या डिटेल्स.
India Hockey Team

India Hockey Team

Sakal

Updated on

India vs Pakistan Hockey World Cup 2026: हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा यंदा महिला आणि पुरुषांची एकत्र बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये १५ ऑगस्टपासून खेळवली जात आहे. या सामन्यात भारतीय पुरुष संघाची कामगिरी संमिश्र झाली आहे. त्यामुळे आता पहिल्या फेरीत पाकिस्तानविरुद्ध होणारा सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा आहे.

या स्पर्धेत पहिल्या फेरीसाठी भारतीय पुरुष संघ डी ग्रुपमध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारतासह वेल्स, इंग्लंड आणि पाकिस्तान हे संघ आहेत. भारताचे पहिले दोन सामने झाले आहेत. आता तिसरा सामना पाकिस्तानविरुद्ध बुधवारी (१९ ऑगस्ट) होणार असून पुढच्या फेरीत जाण्याच्यादृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे.

India Hockey Team
Hockey World Cup: भारतीय संघाने दणादण ६ गोल करत मारलं मैदान! दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com