Sanjay Raut slams BCCI & Modi Govt
esakal
Sanjay Raut targets BCCI and Modi government after Pakistan’s Sahibzada Farhan did a firing-style celebration : आशिया कप स्पर्धेतील सुपर फोर फेरीत भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने दणदणीत पराभव केला आहे. हा भारताचा पाकिस्तानविरुद्धचा दुसरा विजय होता. या सामन्यात पाकिस्तानी सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानने केलेलं सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरलं. अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने बॅट बंदुकीप्रमाणे पकडत फायरिंग स्टाईल सेलिब्रेशन केलं. यावरुनच आता नवा वाद निर्माण झाला आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी यावरून बीसीसीआय आणि मोदी सरकारला लक्ष्य केलं.