Shashi Tharoor on Asia Cup
esakal
Shashi Tharoor on Asia Cup 2025 Statement : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र निषेध सुरू असतानाही 'आशिया कप'मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात दोन सामने खेळले गेले. या स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. मात्र, पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि देशातील अनेक नागरिकांनी भारतीय खेळाडूंच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.