India Vs Pakistan T20WC22 : MCG चा पिच रिपोर्ट काय म्हणतोय... भारताला देणार का साथ?

India Vs Pakistan T20 World Cup 2022 Melbourne Cricket Ground Pitch Report
India Vs Pakistan T20 World Cup 2022 Melbourne Cricket Ground Pitch Reportesakal

India Vs Pakistan T20 World Cup 2022 MCG Pitch Report : ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी 20 वर्ल्डकप 2022 मधील सर्वात हाय व्होल्टेज सामना, भारत आणि पाकिस्तान सामना अवघ्या काही तासात सुरू होईल. सर्व चाहते मेलबर्नमधील आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. काळवंडलेल्या ढगांकडे पाहून चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. मात्र आम्ही तुमची आकाशाकडे लागलेली नजर थोडी खाली आणू इच्छितो. कारण जरी सामन्यावेळी पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी आयसीसी सर्वाधिक पैसा मिळवून देणारा हा भारत पाकिस्तान सामना कोणत्याही परिस्थिती खेळवणार हे नक्की आहे. त्यामुळेच भारताच्या दृष्टीने MCG ची खेळपट्टीही तितकीच महत्वाची आहे. म्हणूनच प्रशिक्षक राहुल द्रविडने खेळपट्टीवर बराच काळ घालवला.

India Vs Pakistan T20 World Cup 2022 Melbourne Cricket Ground Pitch Report
IND vs PAK T20 Playing 11 : टीम इंडियामध्ये शमी खेळण्याबाबत शंका, जाणून घ्या कोणाला मिळणार संधी

MCG वर दबदबा कोणाचा?

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या पाच क्रमांकावर वेगवान गोलंदाजच आहे. म्हणजेच MCG ग्राऊंड हे वेगवान गोलंदाजांचे माहेरघर आहे. खेळपट्टीवर कायम सढळ हाताने गवत सोडण्यात येते. त्यामुळे वेगवान गोलंदाजांचा MCG वर बोलबाला असतो.

किती धावा ठरतील सेफ?

MCG ग्राऊंडवर आधीच्या सामन्यातील आकडेवारी पाहिली तर 160 ते 170 धावा या चांगल्या धावा मानल्या जात आहेत.

भारताची MCG वर सर्वोच्च धावसंख्या किती?

भारताने 2016 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलियाविरूद्ध 184 धावा ठोकल्या होत्या. भारताची ही MCG वरील सर्वोच्च धावसंख्या आहे.

India Vs Pakistan T20 World Cup 2022 Melbourne Cricket Ground Pitch Report
IND vs PAK T20 Live: मेलबर्नमध्ये काळे ढग; जाणून घ्या हवामान रिपोर्ट

भारताचं MCG रेकॉर्ड काय सांगतं?

भारताने आतापर्यंत मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 4 टी 20 सामने खेळले आहेत. त्यातील दोन सामन्यात विजय मिळवला असून एका सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नव्हता.

पाकिस्तानचं काय?

पाकिस्तानने MCG वर आतापर्यंत एकच सामना खेळला आहे. तो देखील 2010 ला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला मात दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com