India vs Pakistan Women ODI 2025
esakal
India vs Pakistan Women ODI 2025: यंदाच्या आशिया चषक 2025 मध्ये भारताने पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केले आहे. साखळी फेरी आणि सुपर 4 मध्ये भारताने पाकिस्तानवर सहज मात केली. त्यानंतर रविवारी झालेल्या अंतिम सामन्यातही भारताने पाकिस्तानला धूळ चारत नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. महत्त्वाचे म्हणजे, आता या स्पर्धेनंतर अवघ्या दोन आठवड्यांनी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आले आहे.