IND Vs SA T20 World Cup 2022 : माक्ररम - मिलर जोडी ठरली किलर; भारताचा वर्ल्डकपमध्ये 13 वर्षांनी केला पराभव

 IND Vs SA T20 World Cup 2022 LIVE
IND Vs SA T20 World Cup 2022 LIVE ESAKAL

India vs South Africa T20 World Cup 2022 : : टी 20 वर्ल्डकप ग्रुप 2 मधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचे 5 विकेट्सनी पराभव करत गुणतालिकेत पाच गुणांसह अव्वल स्थान पटकावले. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या सेमी फायनल गाठण्याच्या भाबड्या आशेवर पाणी फिरले. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 134 धावांचे आव्हान ठेवले होते. खराब सुरूवातीनंतर एडिन माक्ररम (51) आणि डेव्हिड मिलर (46 चेंडूत नाबाद 59 धावा) यांनी डाव सावरत झुंजार अर्धशतकी खेळी करत भारताचे आव्हान षटकात पार केले. भारताकडून अर्शदीप सिंगने 2 तर हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांनी सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. भारताकडून सूर्यकुमार यादवने 40 चेंडूत झुंजार 68 धावा केल्या. या खेळीच्या जोरावरच भारत 133 धावांपर्यंत पोहचू शकला.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 20 षटकात 9 बाद 133 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एन्गिडीच्या भेदक माऱ्यासमोर भारताची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज देत 40 चेंडूत 68 धावांची खेळी करत भारताला शतकी मजल मारून दिली. रोहितने 15 तर विराटने 12 धावा केल्या. या तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने 4 तर वेन पार्नेलने 3 विकेट्स घेतल्या.

डेव्हिड मिलरने केले आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब

डेव्हिड मिलरने 46 चेंडूत नाबाद 59 धावा करत आफ्रिकेचा शेवटच्या षटकात चौकार मारत विजय निश्चित केला.

100-4 : हार्दिकने दिला दिलासा

माक्ररमने 39 चेंडूत अर्धशतकी खेळी केल्यानंतर हार्दिक पांड्याने त्याला 16 व्या षटकात 51 धावांवर बाद करत भारताला दिलासा दिला.

RSA 85/3 (14)  : माक्ररम - मिलर झाले आक्रमक 

माक्ररम - मिलर या दोघांनी 10 व्या षटकापर्यंत संथ फलंदाजी करत फक्त 40 धावा केल्या. मात्र त्यानंतर त्यांनी हार्दिक पांड्या आणि आर. अश्विनवर हल्ला चढवण्यास सुरूवात केली. 14 व्या षटकात 85 धावांपर्यंत मजल मारून दिली.

RSA 40/3 (10) माक्ररम - मिलरची सावध फलंदाजी

भारताने सुरूवातीलाच 3 धक्के दिल्यानंतर एडिन माक्ररम आणि डेव्हिड मिलर यांनी सावध फलंदाजी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

24-3 : मोहम्मद शमीने कर्णधाराला धाडले माघारी 

दक्षिण आफ्रिकेला पाठोपाठ दोन धक्के बसल्यानंतर कर्णधार टेम्बा बाऊमा आणि एडिन माक्ररम यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात मोहम्मद शमीने बाऊमाला 10 धावांवर बाद केले.

 3-2 : अर्शदीप सिंगचा दुसरा धमाका

अर्शदीप सिंगने आपल्या पहिल्या आणि संघाच्या दुसऱ्याच षटकात क्विंटन डिकॉक पाठोपाठ शतकी खेळी करणाऱ्या रॉसोला शुन्यावर माघारी धाडले.

3-1 : अर्शदीपने आफ्रिकेला दिला पहिला धक्का

भारताच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर क्विंटन डिकॉकला 1 धावेवर बाद केले.

दक्षिण आफ्रिकेसमोर भारताचे 134 धावांचे आव्हान 

127-8 : सूर्याची झुंजार खेळी पार्नेलने आणली संपुष्टात

सूर्यकुमार देखील 19 व्या षटकात 40 चेंडूत 68 धावांची झुंजार खेळी करून परतला.

124-7 : अश्विन देखील परतला

स्लॉग ओव्हरमध्ये सूर्यकुमार फटकेबाजी करत असताना अश्विनने देखील 7 धावांची भर घालून सूर्याची साथ सोडली.

 101-6 : दिनेश कार्तिकने साथ सोडली

सूर्यकुमार यादव आणि दिनेश कार्तिक यांनी सहाव्या विकेटसाठी 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र शेटवची 5 षटके राहिली असताना वेन पार्नेलने 15 चेंडूत 6 धावा करणाऱ्या दिनेश कार्तिकला माघारी धाडत ही जोडी फोडली.

सूर्याचे सलग दुसरे अर्धशतक 

भारताची अवस्था 5 बाद 49 धावा अशी केली. यानंतर सूर्यकुमार यादव आणि दिनेश कार्तिक यांनी डाव सावरला. सूर्यकुमार यादवने विकेट्स पडून देखील आपली आक्रमकता कुठेही कमी केली नाही. त्याने 30 चेंडूत 50 धावा ठोकत संघाला 15 व्या षटकात शतकी मजल मारून दिली.

67-5 (11 Ov) : सूर्याने डाव सावरला

लुंगी एन्गिडीसमोर भारताच्या सगळ्या स्टार फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर सूर्यकुमार यादवने भारताचा डाव सावरला.

49-5 : एन्गिडी भारताच्या राशीला लागला

एन्गिडी भारताची टॉप ऑर्डर उडवून शांत बसला नाही तर त्याने आपल्या तिसऱ्या षटकात हार्दिक पांड्याला देखील 2 धावेवर बाद करत भारताची अवस्था 5 बाद 49 धावा अशी केली.

42-4  : दीपक हुड्डाने संधी दवडली

भारताची पॉवर प्लेमध्येच 3 बाद 41 धावा अशी अवस्था झाली होती. आजच्या सामन्यात अक्षर पटेलच्या जागी संधी मिळालेल्या दीपक हुड्डाकडे हिरो होण्याची नामी संधी होती. मात्र तो नॉर्त्जेच्या चेंडूवर शुन्यावर बाद झाला.

41-3 : भारताचा एन्गिडीसमोर लुंगी डान्स

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीने भारताची टॉप ऑर्डर एकट्याने उडवली. त्याने राहुल, रोहित पाठोपाठ विराट कोहलीला देखील बाद करत भारताची अवस्था 3 बाद 41 अशी केली. विराट कोहली 2 चौकार मारत 11 चेंडूत 12 धावा करून माघारी परतला.

26-2 : केएल राहुलकडून पुन्हा निराशा 

एन्गिडीने पाचव्या षटकात दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर रोहित शर्माला बाद केले होते. त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने केएल राहुलला 9 धावांवर बाद करत भारताचा दुसरा सलामीवीर देखील माघारी धाडला.

23-1 : रोहित शर्मा बाद 

एन्गिडीने भारताला पॉवर प्लेच्या पाचव्या षटकात पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार रोहित शर्माला 15 धावांवर बाद केले.

वेन पार्नेलने पहिलेच षटक टाकले निर्धाव

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या वेन पार्नेलने केएल राहुलला पहिलेच षटक निर्धाव टाकत चांगलाच दबाव वाढवला.

भारताने नाणेफेक जिंकली

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतला. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. अक्षर पटेलच्या जागी दीपक हुड्डाला संघात स्थान देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com