IND vs RSA : पाकिस्तान आज इंडिया.. इंडिया.. करणार; रोहित सेनेसाठी असेल मोठी परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Vs South Africa T20 World Cup 2022 Match Pakistan Cheers For India

IND vs RSA : पाकिस्तान आज इंडिया.. इंडिया.. करणार; रोहित सेनेसाठी असेल मोठी परीक्षा

India Vs South Africa T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्डकप 2022 ग्रुप 2 मध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिका हे तुल्यबळ संघ एकमेकांना भिडणार आहे. भारताने आपले दोन्ही सामने जिंकून गुणतालिकेत 4 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. भारताने पाकिस्तानचा एक अवघड पेपर पास केला असून आज दक्षिण आफ्रिकेचा पेपर पास करणं बाकी आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा एक सामना वॉश ऑउट झाल्याने ते दोन सामन्यात तीन गुण घेऊन तिसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकून सेमी फायनलसाठी आपली दावेदारी मजबूत करण्याच्या उराद्यात असणार आहेत. मात्र या सामन्याकडे पाकिस्तानचेही लक्ष असणार आहे. विशेष म्हणजे भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तान भारताच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसणार आहे.

हेही वाचा: BAN vs ZIM : एकाच षटकात विकेट, चौकार, षटकार, नो बॉल अन् बरंच काही घडलं...

पाकिस्तानने भारताबरोबरचा आपला पहिला सामना शेवटच्या चेंडूवर गमावला. तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने त्यांना 1 धावेने मात देत मोठा धक्का दिला. आज पाकिस्तान नेदरलँडविरूद्धच्या सामन्यात या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करेल. मात्र त्यांचे लक्ष भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यावर देखील असले. कारण त्यांची सेमीफायनलची आशा या सामन्यावर टिकून आहे. पाकिस्तानला सेमी फायनल गाठण्यासाठी फक्त पुढचे सामने जिंकणे आणि चांगली धावगती राखण्याने काम होणार नाहीये. तर पाकिस्तानला भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या विजयाची देखील 'दुवा' गरजेची आहे.

हेही वाचा: ZIM vs BAN : भारत - पाक थरार विसरा! झिम्बाब्वे बांगलादेश सामन्यातही 'नो बॉल' ठरला दुखरी नस

दुसरीकडे भारत दक्षिण आफ्रिकेनंतर झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्याशी देखील भिडणार आहे. भारतीय संघ आपल्या तीन पैकी एका सामन्यात जरी विजय मिळवते तर सेमी फायनलमध्ये पोहचेल. मात्र पाकिस्तानला उर्वरित सामने जिंकून देखील उतर संघांच्या जय पराजयावर अवलंबून रहावे लागणार आहे. पाकिस्तान आज नेदरलँडविरूद्ध सामना खेळतोय. याचबरोबर त्यांना दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचेही तगडे आव्हान पार करावे लागणार आहे.