esakal | INDvsSL : भारताचा लंकेवर दणदणीत विजय, मालिकेवर 2-0ने कब्जा!
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Sri Lanka 3rd T20I : India win by 78 runs
  • सामन्याला जवळपास 35 हजार प्रेक्षकांची हजेरी
  • संजूचे पाच वर्षांनी ट्वेंटी20मध्ये पुनरागमन
  • धवन पाच धावांवर ड्रॉप
  • पावरप्लेमध्ये भारताच्या 63 धावा, शिखर-राहुल दोघांच्या 30 धावा

INDvsSL : भारताचा लंकेवर दणदणीत विजय, मालिकेवर 2-0ने कब्जा!

sakal_logo
By
हर्षदा कोतवाल

पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेंटी20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर 78 धावांनी विजय मिळवत मालिका 2-0 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करत भारताने लंकेसमोर 202 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने लंकेचा डाव 123 धावांत गुंडाळला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रथम फलंदाजी करताना सलामीला आलेल्या शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पावरप्लेमध्ये 63 धावा चोपल्या. 11व्या षटकात धवनने अर्धशतक पूर्ण केले आणि दोन धावा करुन लगेच बाद झाला. पहिलाच षटकार अन् लगेच आऊट धवन बाद झाल्यावर स्टेडियम विराट विराटच्या नावाने कल्ला करु लागलं पण मैदानात संजू सॅमसनची एण्ट्री झाली. तब्बल पाच वर्षांनी टी20 सामना खेळणाऱ्या संजूने पहिल्याच चेंडूवर लॉंग ऑफवर षटकार ठोकला. मात्र, आणखी केवळ दोन चेंडू खेळून डि  सिल्व्हाच्या गुगलीवर तो पायचित झाला. 

मंत्री होऊन गोव्याला गेला अन् एका मसाजने...

डावाला गळती
चौथ्या क्रमांकावर मनिष पांडे फलंदाजीला आला. 13व्या  षटकात लोकेश राहुलचे अर्धशतक पूर्ण झाले. त्यानतंर एक चौकार ठोकून पुढच्याच चेंडूवर राहुल 54 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यरसुद्धा चार धावा करुन बाद झाला. 

कोहली दुसऱ्यांदा सहाव्या क्रमांकावर 
आज विराट कोहली सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची ही त्याची दुसरी वेळ होती. यापूर्वी आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात तो सहाव्या क्रमांकावर खेळला होता. 18व्या षटकात नसलेली दुसरी धावा 
पळताना कोहली 26 धावांवर धावबाद झाला. कोहली बाद झाल्यावर गेल्या सामन्यात फटकेबाजी करणाऱ्या शार्दुलने आणि पांडेने अखेरच्या षटकात एक षटकार आणि दोन चौकार मारत दोघांनी भारताला 201 टप्पा गाठून दिला.  

लंकेच्या डावाला सुरवात झाल्यावर पहिल्याच षटकात बुमराने धनुष्का गुनतिलकाला बाद केले. त्यानंतर लगेचच दुसऱ्या षटकात शार्दुलने अविष्का फर्नांडोला बाद केले. जवळपास 15 महिन्यांनी पुनरागमन करणारा एंजेलो मॅथ्यूज आणि डि-सिल्व्हा वगळता लंकेच्या एकाही फलंदाजाला मैदानावर टिकता आले नाही. शार्दुलने 14व्या षटकात दासुन शानका आणि वानिडू हसरंगा यांना बाद केले. पुढच्या दोन षटकात लंकेचे आणखी तीन फलंदाज बाद झाले आणि अखेर लंकेचा डाव 16व्या षटकांतच संपला. 

JNU Attack : स्मृती इराणींचे दीपिकाला थेट आव्हान; म्हणाल्या...

बुमराच्या सर्वाधिक विकेट
भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराने अव्वल क्रमांक गाठला. त्याने पहिल्याच षटकात धनुष्का गुनतिलकाला बाद करत भारताचे स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहर यांना मागे टाकले. बुमराच्या नावावर टी-20मध्ये भारताकडून सर्वाधिक 53 विकेट आहेत. यापूर्वी अश्विन आणि चहल हे दोघेही 52 विकेटसह पहिल्या क्रमांकावर होते.

दृष्टीक्षेपात सामना 
- सामन्याला जवळपास 35 हजार प्रेक्षकांची हजेरी
-संजूचे पाच वर्षांनी ट्वेंटी20मध्ये पुनरागमन
-धवन पाच धावांवर ड्रॉप
-पावरप्लेमध्ये भारताच्या 63 धावा, शिखर-राहुल दोघांच्या 30 धावा
- 11 व्या षटकात धवनचे अर्धशतक, भारताचे शतक
- तिसऱ्या क्रमांकावर संजू सॅमसनला बढती
- पहिल्याच चेंडूवर संजूचा षटकार
- 13 व्या षटकात राहुल (54) आणि अय्यर (4) बाद
- कोहली टी20मध्ये पहिल्यांदा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला
- वॉशिंग्टनचा गोल्डन डक
- अखेरच्या षटकात 19 धावा
- बुमराच्या टी20मध्ये भारताकडून सर्वाधिक (53) विकेट
- पहिल्या चार षटकात लंकेच्या तीन विकेट
- पावरप्लेच्या अखेरीस श्रीलंका 35-4
- 13व्या षटकात ठाकूरला दोन विकेट
- लंकेचा डाव 16 षटकांतच संपुष्टात

संक्षिप्त धावफलक 
भारत ः 
लोकेश राहुल- 54(36) 5(4) 1(6), शिखर धवन 52(36) 7(4) 1(6), संजू सॅमसन 6(2), मनिष पांडे 31(18) 4(4), श्रेयस अय्यर 4(2), विराट कोहली 26(17), शार्दुल ठाकूर 22(8) 1(4) 2(6). लक्षण संदाकन 4-35-3

श्रीलंका ः धनुष्का गुनतिलका 1(2), अविष्का फर्नांडो 9(7), कुसल परेरा 7(10), ओशादा फर्नांडो 2(5), एंजेलो मॅथ्यूज 31(20) 1(4) 3(6), धनंजया डि सिल्व्हा 57(36) 8(4) 1(6), दासुन शानका 9(9), लक्षण संदाकन 1(2), लाहिरु कुमारा 1(1) नवदीप सैनी 3.5-28-3, शार्दुल ठाकूर 3-19-2, वॉशिंगटन सुंदर 4-37-2

loading image
go to top