पिच सुकविण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर; गांगुलीवर टीका

वृत्तसंस्था
सोमवार, 6 जानेवारी 2020

जगभरातील सर्वांत श्रीमंत असलेल्या क्रिकेट मंडळाकडून पिच सुकविण्यासाठी जळता कोळसा आणि हेअर ड्रायरचा वापर करण्यात आला. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर बीसीसीआयवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

गुवाहाटी : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पाऊस झाल्यानंतर खेळपट्टी (पिच) सुकविण्यासाठी चक्क हेअर ड्रायरचा वापर करण्यात आल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) टीका होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरातील सर्वांत श्रीमंत असलेल्या क्रिकेट मंडळाकडून पिच सुकविण्यासाठी जळता कोळसा आणि हेअर ड्रायरचा वापर करण्यात आला. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर बीसीसीआयवर जोरदार टीका करण्यात येत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जगभरात भारताची मान खाली घालविली अशी जोरदार टीका होत आहे. तर, माजी क्रिकेटपटू व्हिव्हिएस लक्ष्मण, आकाश चोप्रा यांनी मैदानाची योग्य ती काळजी राखण्यात ग्राउंड स्टाफ अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.

#JNU : 'जेएनयू'मध्ये पुन्हा राडा; विद्यार्थी संघटनेची प्रमुख जखमी
 
या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेकीचा कौल अनुकूल लागताच चटकन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सामन्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडू मैदानात उतरण्यापूर्वीच पावसाने आपली खेळी सुरू केली. पाऊण तासाने पावसाने ब्रेक घेतला खरा; पण सामना होऊ शकला नाही. पंच टिशू पेपरने मैदानातील ओलावा बघत होते. तर, ग्राउंड स्टाफ संघव्यवस्थापनाबरोबरही प्रसंगी चर्चा करीत होते; पण त्यांची देहबोली मैदान खेळण्यास योग्य असल्याचे दाखवत नव्हती. अखेर तसेच झाले अन् सामना रद्द झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india vs sri lanka guwahati t20 abandoned due to wet outfield