Hockey World Cup: भारतीय संघानं इंग्लंडला रोखलं अन् पुढच्या फेरीतही स्थान मिळवलं! इंग्लिश संघाचं आव्हान संपलं

India vs England, Women's Hockey World Cup 2026: हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत आणि इंग्लंड महिला संघात करो वा मरो सामना गुरुवारी झाला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला रोखत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताची गोलकिपर बिछू देवीने अफलातून बचाव केला.
India Women's Hockey Team

India Women's Hockey Team

Sakal

Updated on

Hockey World Cup 2026, India Women vs England Women: हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत गुरुवारी भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये निर्णायक सामना झाला. पहिल्या फेरीतील डी गटातील हा दोन्ही संघांचा अखेरचा साखळी सामना होता.

या सामन्यात शेवटपर्यंत अत्यंत रोमांचक लढत पाहायला मिळाली. पण अखेर भारतीय संघाने इंग्लंडला ०-० असे गोलशून्य बरोबरीत रोखले. त्यामुळे भारतीय महिला संघाने पुढच्या फेरीत प्रवेश केला, तर इंग्लंडचे आव्हान संपले आहे. भारताची गोलकिपर बिछू देवीने अफलातून बचाव केला.

पुढच्या फेरीत जाण्यासाठी भारतीय संघाला बरोबरी किंवा विजयाची गरज होती, तर इंग्लंडला विजयच आवश्यक होता. पण भारताने बरोबरी केल्याने पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. डी गटातून चीन आणि भारत या दोन संघांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला असून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांचे आव्हान संपले आहे.

India Women's Hockey Team
Hockey World Cup, IND vs PAK: भारताकडून गोलचा पाऊस अन् पाकिस्तान आऊट! दणदणीत विजयासह हरमनप्रीतचा संघ पुढच्या फेरीत
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com