esakal | U19 World Cup : आयसीसीने सिलेक्ट केले भारताकडून एकमेव पंच!
sakal

बोलून बातमी शोधा

U19 World Cup

आयसीसीने तीन सामनाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये श्रीलंकेचे ग्रॅमी लबरॉय, दक्षिण आफ्रिकेचे शाहिद वडवल्ला आणि इंग्लंडचे फिल व्हिटीकेस यांचा समावेश आहे.

U19 World Cup : आयसीसीने सिलेक्ट केले भारताकडून एकमेव पंच!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दुबई : दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या 19 वर्षांखालील विश्वकरंडकासाठी पंच म्हणून भारताच्या फक्त अनिल चौधरी यांची निवड झाली आहे. 17 जानेवारीपासून या विश्वकरंडकास सुरवात होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या स्पर्धेसाठी 19 पंचांचा समावेश असलेला संच आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 16 पंचांचा समावेश आहे. या 16 पंचांमध्ये स्थान मिळालेले चौधरी हे एकमेव पंच आहेत. मूळचे दिल्लीचे असलेल्या चौधरी यांनी यापूर्वीही 19 वर्षांखालील विश्वकरंडकात पंच म्हणून कामगिरी पार पाडली आहे. 

गेल्या वर्षी झालेल्या पुरुषांच्या विश्वकरंडकात पंच म्हणून निवृत्त झालेले इआन गोल्ड हे गतविजेत्या भारतीय संघाच्या पहिल्या सामन्यात सामनाधिकारी म्हणून जबाबदारी पाहतील, असे आयसीसीने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारताचा पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. 

- INDvsNZ : न्यूझीलंड संघ खेळणार कसा? दुखापतीने 'हे' चार महत्वाचे खेळाडू संघाबाहेर

आयसीसीने तीन सामनाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये श्रीलंकेचे ग्रॅमी लबरॉय, दक्षिण आफ्रिकेचे शाहिद वडवल्ला आणि इंग्लंडचे फिल व्हिटीकेस यांचा समावेश आहे. 

बादफेरीतील सामन्यांसाठी पंच आणि सामनाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा संघ जाहीर झाल्यानंतर करण्यात येणार आहे. अंतिम सामन्यासाठी उपांत्य फेरीनंतर नावे जाहीर करण्यात येणार आहेत. 

- Video : 'बीबीएल'मध्ये अफगाण-पाक गोलंदाजांनी घेतल्या हॅट्ट्रिक!

पंचांवर जबाबदारी 
- 12 देशांतील पंच
- पहिल्या फेरीपर्यंत प्रत्येकाला पाच सामन्यांत संधी
- 12 पैकी आठ तिसरे पंच म्हणूनही काम पाहणार

चौधरींची कारकीर्द 
- 20 एकदिवसीय सामने
- 27 टी20 सामने
- सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतही पंच

- महाराष्ट्र केसरी 2020 : हर्षवर्धन सदगीरने जिंकली मानाची गदा

आम्ही स्पर्धेसाठी सर्वोत्तम पंच निवडण्यास बांधिल आहोत. दक्षिण आफ्रिकेला जाणारा हा संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल असा मला विश्वास आहे. माझ्याकडून त्यांना खूप शुभेच्छा!
- ऍडरियन ग्रिफिथ, आयसीसी वरिष्ठ व्यवस्थापक (पंच आणि सामनाधिकारी)