भारतीय क्रिकेटला बसलाय ड्रॅगनचा विळखा; आयपीएलपासून देशांतर्गत सामन्यांमघ्ये सर्वत्र "गुंतवणूक'... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

चिनी वस्तू आणि तेथील कंपन्यांविरोधाची धार सातत्याने वाढत आहे. त्याचा भारतीय क्रिकेट मंडळास मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली / मुंबई ः चिनी वस्तू आणि तेथील कंपन्यांविरोधाची धार सातत्याने वाढत आहे. त्याचा भारतीय क्रिकेट मंडळास मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत. देशातील सर्वात अतिश्रीमंत असलेल्या क्रीडा संघटनेस चीनचा भक्कम टेकू आहे, त्यासच आता हादरा बसण्याची चिन्हे आहेत. 

बोलाच भात अन् बोलाचीच कढी; एकीकडे चीनी मालावर बहिष्काराच्या घोषणा आणि दुसरीकडे चीनी मोबाईलवर भारतीयांच्या उड्या...

प्रक्षेपणाद्वारे मिळणारी किंमत पाहिल्यास आयपीएल ही जगातील आघाडीच्या पाच लीगपैकी एक आहे. आता या लीगच्या पुरस्कर्त्याची चिनी लिंक आहे. चीनमधील मोबाईल कंपनी असलेली विवो आयपीएलचे पाच वर्षांचे पुरस्कर्ते आहेत. हा पुरस्कार बावीसशे कोटीचा आहे. ऑनलाईन फॅंटसी लीग ड्रीम इलेव्हनवर होते, तर पेटीएम ही इ-कॉमर्स कंपनी सहपुरस्कर्ती आहे. ड्रीम इलेव्हन तसेच पेटीएमला चीनमधील कंपन्यांचे आर्थिक पाठबळ आहे. 

डबिंग करताना अभिनेत्री हीना खान घाबरली...काम सुरू केलेय; पण...

सध्या तरी आम्ही कोणत्याही पुरस्कर्त्यांबाबत फेरविचार केलेला नाही. आम्हाला त्याबाबतच्या कोणत्याही सूचना केंद्र सरकारने दिलेल्या नाहीत, असे भारतीय मंडळाचे खजिनदार अरुण धुमळ यांनी सांगितले. मात्र आमच्या आर्थिक हितापेक्षा देशहित नेहमीच जास्त महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. 

दुष्काळात तेरावा महिना ! ऐन लॉकडाऊनमध्ये डिझेल दरवाढीने एसटीचे चाक आणखी खोलात...

चीनमधील कंपन्यांनी आयपीएलला पुरस्कृत केले नसते, तर तो सर्व पैसा चीनमध्ये गेला असता. आता तो पैसा भारतातच राहत आहे. आता ती रक्कम आम्हाला मिळाल्यावर त्यावरच कर आम्ही भारत सरकारला देत आहोत, असे मंडळाचे खजिनदार अरुण धुमळ यांनी सांगितले. आता भारतात स्टेडियम उभारण्यासाठी चीनमधील कंपनीसह करार केल्यास ती रक्कम चीनमधील कंपनीस जाते. त्याचा फायदा चीनच्या अर्थव्यवस्थेस होतो. मात्र गुजरातमधील स्टेडियमची उभारणी भारतीय कंपनी करीत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. क्रिकेटच्या सुविधा उभारणीसाठी चीन कंपन्यांची मदत घेतली जात नाही. 

यंदाच्या आषाढी एकादशीला 'प्रति पंढरपूर'चे होणार दर्शन ऑनलाईन... 

आकडे बोलतात.. 

  • 2200 कोटी : पाच वर्षांचा आयपीएल करार 
  • 1079 कोटी : बायजुस भारतीय संघाचे पुरस्कर्ते 
  • 5.27 टक्के टेनसेंटची हिस्सेदारी स्विगीमध्ये, स्विगी आयपीएलचे सहपुरस्कर्ते. 
  • 3 कोटी 80 लाख : (प्रत्येक सामन्यासाठी) भारतातील आंतरराष्ट्रीय सामन्याचे पेटीएम पुरस्कर्ते 
  • 37.15 टक्के : पेटीएममध्ये अलीबाबाचा वाटा 

भारतीय क्रिकेटमधील ड्रॅगनची चाल 

  • विवो ही चीनमधील कंपनी आयपीएलची मुख्य पुरस्कर्ती 
  • टेनसेंट या चीनमधील कंपनीचा ड्रीम इलेव्हनमध्ये मोठा सहभाग 
  • बायजुसला आर्थिक पाठबळ टेनसेंटकडून 

बिग बॉस 11 मधील 'हा' स्पर्धक नैराश्यामध्ये; वाचा सविस्तर...

चिनी कंपन्यांचा पाठिंबा आणि पुरस्कार यात फरक 
कोणत्याही प्रश्नाचा भावनिकदृष्ट्या विचार केल्यास त्याचा फटका बसू शकतो. आपण चिनी कंपनीला पाठबळ देण्याचा आणि चिनी कंपन्यांकडून भारतीयांसाठी पाठबळ घेण्यातील फरक समजून घ्यायला हवा. चिनी कंपन्यांना भारतात बिझनेस करण्यास मंजुरी आहे. भारतीय ग्राहंकाकडून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही भाग चिनी कंपन्या पुरस्कार रक्कम म्हणून भारतीय मंडळास देत आहेत. त्यातील 42 टक्के रक्कम आम्ही कर म्हणून सरकारला देत आहोत. हे भारतासाठी अनुकूल आहे. चीनसाठी नव्हे, असा दावा भारतीय मंडळाचे खजिनदार अरुण धुमळ यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian cricket along with ipl has chinese sponsorship amid india china face off