Rahul Dravid Bowling | IND vs NZ : द्रविड गुरूजींनी स्वत:च केली बॉलिंग, पाहा Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul-Dravid-Bowling

न्यूझीलंड विरूद्ध उद्यापासून भारताची कसोटी मालिका

IND vs NZ : द्रविड गुरूजींनी स्वत:च केली बॉलिंग, पाहा Video

sakal_logo
By
विराज भागवत

IND vs NZ Tests : भारतीय संघाची उद्यापासून न्यूझीलंड विरूद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे. २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान पहिली कसोटी तर ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. कर्णधार विराट कोहली या मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. तर रोहित शर्मा, लोकेश राहुल संपूर्ण मालिकेत खेळणार नाहीयेत. त्यामुळे भारतीय संघाची धुरा अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांवरच असणार आहे. या दरम्यान सराव सत्रात नवे कोच राहुल द्रविड यांनीही गोलंदाजी केल्याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: "द्रविड माझं पहिलं प्रेम"; हॉट बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा

राहुल द्रविडने टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षकपदाचा पदभार स्वीकारला. पद स्वीकारल्यानंतर न्यूझीलंड विरूद्ध टी२० मालिकेत भारताने दमदार विजय मिळवला. त्यानंतर आता दोन सामन्यांची कसोची मालिका सुरू होणार आहे. त्याआधी द्रविड गुरूजींनी गोलंदाजी करण्याचा आनंद लुटल्याचे दिसून आले.

हेही वाचा: IND vs NZ: सूर्यकुमार की श्रेयस.. चौथ्या नंबरवर कोणाला बॅटिंग?

भारताचा कसोटी संघ (Team India Test Squad)

अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा

loading image
go to top