Team India Cricketer | "ते २-३ दिवस खूपच वाईट होते"; भारतीय क्रिकेटरचा अंगावर काटा आणणारा अनुभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team-India-Sad

एका मुलाखती दरम्यान खेळाडूने सांगितली आठवण

"ते २-३ दिवस खूपच वाईट होते"; भारतीय क्रिकेटरचा अनुभव

sakal_logo
By
विराज भागवत

Team in T20 World Cup : भारतीय संघासाठी टी२० विश्वचषक स्पर्धा फारशी चांगली ठरली नाही. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या तुल्यबळ संघांविरोधात भारताला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर भारताने पुढील तीनही सामने मोठ्या फरकाने जिंकले पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. भारतीय संघाचा विश्वचषक स्पर्धेतील प्रवास साखळी फेरीतच संपला. या स्पर्धेसाठी भारताचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल याला वगळण्यात आले होते. त्या संदर्भातील एक आव्हानात्मक प्रसंग त्याने सांगितला.

हेही वाचा: T20 WC: ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडही मालामाल! किती बक्षीस मिळाले माहितीये?

"टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होणार होती. त्यावेळी माझंही लक्ष संघ जाहीर होण्याकडेच होतं. गेल्या चार वर्षात मी कधीही संघातून बाहेर गेलो नव्हतो. पण टी२० वर्ल्डकप सारख्या बड्या स्पर्धेतच मला संघाबाहेर करण्यात आले. या गोष्टीचा मला धक्काच बसला. मला खूप वाईट वाटलं. दोन-तीन दिवस मी खूपच दु:खी होतो. माझी तहान भूक सारं काही हरपलं होतं. पण त्यानंतर मी विचार केला की IPL चा दुसरा टप्पा अद्याप शिल्लक आहे. आणि तोच विचार करून मी माझ्या प्रशिक्षकांशी संवाद साधत जोरदार तयारी केली", अशी आठवण युजवेंद्र चहलने सांगितली.

हेही वाचा: IND vs NZ Test : वानखेडे स्टेडियवर 100 टक्के एन्ट्री; राज्य सरकारनं दिली परवानगी

युजवेंद्र चहलची गेल्या काही वर्षातील कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे. असे असूनही त्याला संधी नाकारण्यात आली होती. त्यानंतर चहलची पत्नी धनश्री हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट टाकून चहलला धीर दिला होता. भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याला संघात स्थान न मिळाल्याने तो काहीसा हिरमुसला. त्यामुळे त्याची पत्नी धनश्री हिने त्याच्यासाठी एक खास पोस्ट इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर टाकली होती.

"आई नेहमी म्हणते की ही (वाईट) वेळही एक दिवस निघून जाईल. ताठ मानेने जग. कारण प्रतिभा आणि चांगली कर्म कायम तुमची साथ देतात. त्यामुळे आता गोष्ट अशी आहे की हे वाईट दिवसही नक्कीच जातील आणि चांगले दिवस येतील. कारण देव महान आहे", अशा आशयाची इन्स्टा-स्टोरी तिने ठेवली होती.

loading image
go to top