BCCI ने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूवर घातली बंदी! जाणून घ्या प्रकरण...

Indian cricketers
Indian cricketers

Indian Cricket Team : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने आपले पाचही सामने जिंकले असून सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

आता भारताचा पुढील सामना 29 ऑक्टोबरला इंग्लंडशी लखनौच्या एकना स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना मोठा धक्का दिला असून या गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे.

संघाने धरमशाला येथे न्यूझीलंड विरुद्ध पाचवा सामना खेळला आणि त्यानंतर संघाला रविवार 29 ऑक्टोबर रोजी पुढील सामना खेळायचा आहे. अशा स्थितीत संघाला धरमशालामध्ये दोन दिवसांची विश्रांती देण्यात आली होती.

दरम्यान, संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना कळवले आहे की धरमशालामध्ये त्यांच्यासाठी ट्रेकिंगवर पूर्णपणे बंदी आहे. याशिवाय खेळाडूंना पॅराग्लायडिंगही करता येणार नाही. मात्र, भारतीय खेळाडूंना या विश्रांतीदरम्यान धरमशालामध्ये फिरण्याचा आनंद घेतला.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने 'इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना सांगितले की, 'संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना कळवले आहे की ते ट्रेकिंगला जाऊ शकत नाहीत. त्याच वेळी खेळाडू स्पर्धेदरम्यान पॅराग्लायडिंग करू शकत नाहीत, कारण ते खेळाडूंच्या कराराच्या विरोधात आहे.

लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर भारताचा वर्ल्ड कपमधील सहावा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. वृत्तानुसार, भारतीय संघ या सामन्यासाठी 25 ऑक्टोबरला लखनौला पोहोचेल. हा सामना जिंकून टीम इंडिया वर्ल्ड कपच्या सेमीफायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकेल. आतापर्यंत फक्त टीम इंडियाने या स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com