41 वर्षांनी हॉकी संघाने घडवला इतिहास

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर खेळाडूंसह हॉकीप्रेमींनी जल्लोष करत सागर साखर पेढे वाटले.
41 वर्षांनी हॉकी संघाने घडवला इतिहास

कोल्हापूर : भारतीय पुरुष हॉकी संघाच्या विजयाने कोल्हापुरातील खेळाडूंच्या उत्साहाला आज उधाण आले. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर खेळाडूंसह हॉकीप्रेमींनी जल्लोष करत साखर, पेढे वाटले. हलगी, घुमकं, कैताळाच्या तालावर नृत्य करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.

41 वर्षांनी हॉकी संघाने घडवला इतिहास
जातीचा उंबरठा ओलांडून तब्बल 208 जोडपी विवाहबंधनात!

टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने जर्मनीवर ५ विरुद्ध ४ गोल फरकाने मात करत कांस्यपदक पटकावले. सुमारे ४१ वर्षानंतर भारतीय संघाने ही कामगिरी करत हॉकीपटूंना उर्जा दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंना या विजयाने सुखद धक्का दिला. सकाळपासूनच खेळाडू टीव्हीसमोर बसले होते. अखेरच्या क्षणी जर्मनीला बरोबरीची संधी असताना भारतीय गोरक्षकाने जर्मनीच्या खेळाडूचा फटका अडवून विजयात मोलाचा वाटा उचलला.

41 वर्षांनी हॉकी संघाने घडवला इतिहास
पंचनामे करायला अधिकारीच नाहीत; मत्स्य विकास कार्यालयातील स्थिती

मैदानावर खेळाडूंचा जल्लोष असताना कोल्हापुरातील खेळाडू ध्यानचंद स्टेडियमवर एकवटले. हलगी, घुमकं, कैताळाच्या तालावर त्यांनी जल्लोष केला. भारतीय हॉकी संघाचा विजय असो, मेजर ध्यानचंद यांचा विजय असो, अशा घोषणा देत खेळाडूंनी बेभान नृत्य केले. गुलालाची उधळण करत खेळाडूंचा दीड तास जल्लोष सुरू होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com