Neeraj Chopra : चोप्रा पुन्हा एकदा इतिहास रचण्यास तयार; गुरूवारी डायमंड लीगची फायनल

Indian Javelin Thrower Neeraj Chopra
Indian Javelin Thrower Neeraj Chopraesakal

Neeraj Chopra Dimond League : भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा पुन्हा एकदा इतिहास रचण्यास सज्ज झाला आहे. तो गुरूवारी सुरू होणाऱ्या प्रतिष्ठित डायमंड लीग फायनल्सचा प्रबळ दावेदार आहे. नीरज चोप्रा बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेला दुखापतीमुळे मुकला होता. मात्र आता तो दुखापतीतून सावरला असून डायमंड लीगमध्ये जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो जवळपास एक महिना दुखापतीमुळे मैदानापासून दूर होता.

Indian Javelin Thrower Neeraj Chopra
IND vs PAK : क्रिकेट सोडा! इकडं भारतीय महिला फुटबॉल संघानं पाकला धूळ चारली

नीरज चोप्रा लुसाने मध्ये डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला होता. दरम्यान, नीरजने जुलै महिन्यात अमेरिकेतील जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. मात्र याचस्पर्धेतदरम्यान त्याला ग्रॉईन इन्जुरी झाली होती. त्यामुळे त्याला बर्मिंगहममधील राष्ट्रकुल स्पर्धेला मुकावे लागले होते.

भारताच्या 24 वर्षाच्या नीरज चोप्राने या दुखापतीतून सावरत 26 जुलैला झालेल्या लुसानेमध्ये पहिल्या प्रयत्नातच 89.08 मीटर भालाफेक करत टायटल आपल्या नावावर केले होते. त्यावेळी नीरजवर दुखापतीचा काही परिणाम झालाय असे वाटत नव्हते. नीरज चोप्रा 2017 आणि 2018 मध्ये डायमंड लीग फायनल्ससाठी पात्र झाला होता. तो 2017 ला सातव्या तर 2018 मध्ये चौथ्या स्थानावर राहिला होता.

Indian Javelin Thrower Neeraj Chopra
US Open Video : किती हा राग! पराभवानंतर निक कर्गिओसची कोर्टवरच आदळ-आपट

डायमंड लीगच्या फायनल्समध्ये सहा खेळाडू असणार आहेत. यात वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन पीटर्स खेळू शकणार नाही. तो अजून दुखापतीतून सावरलेला नाही. या स्पर्धेत नीरज चोप्राला चेक प्रजासत्ताकच्या याकूब वाडलेजकडून कडवी टक्कर मिळू शकते. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पकद जिंकले होते. मात्र नीरज चोप्राने त्याला लुसानेमध्ये देखील त्याला मात दिली होती. त्यावेळी वाडलेजने 85.88 मीटर भाला फेकला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com