India Vs Japan
India Vs Japanesakal

India Vs Japan : भारताचा जपानवर दणदणीत विजय; दिमाखात गाठली पाचव्यांदा फायनल

India Vs Japan : भारताने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या सेमी फायनलमध्ये जपानचा 5 - 0 अशा मोठ्या गोलफरकाने पराभव करत दिमाखात पाचव्यांदा फायनल गाठली. आता फायनलमध्ये भारताचा सामना हा मलेशियासोबत उद्या (दि.12) होणार आहे. भारताने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी तीनवेळा जिंकली आहे. मलेशिया एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहचले आहे. (Indian Men's Hockey Team)

भारताकडून आकाशदीप सिंह, हरमनप्रीत सिंग, मनदीप सिंह, सुमित आणि सेल्वम कार्ती यांनी गोल केले. भारतासाठी सामन्याचा दुसरा क्वार्टर हा धमाकेदार ठरला. भारताने या क्वार्टरमध्ये तब्बल 3 गोल केले. (Hero Asian Champions Trophy Chennai 2023)

India Vs Japan
WFI Election 2023 : मतदानाच्या एक दिवस आधी भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला न्यायालयाने दिली स्थगिती

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि जपान यांच्यातील सेमी फायनल सामना हा भारतासाठी तसा आव्हानात्मक सामना होता. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या क्वार्टरमध्ये जपानने भारतीय हॉकी संघाने आक्रमण चांगल्या पद्धतीने थोपवून धरले होते. भारताला या क्वार्टरमध्ये गोल करण्याच्या काही संधी मिळाल्या होत्या. मात्र जपानने चांगला बचाव करत आपली गोलपोस्ट भारतीय आक्रमणापासून वाचवली.

India Vs Japan
India vs Japan Hockey : भारत - जपान सेमीफायन केव्हा, कुठं अन् कधी पहायची लाईव्ह... जाणून घ्या एका क्लिकवर

भारत आणि जपान यांच्यातील लीग स्टेजचा सामना 1 - 1 असा बरोबरीत राहिला होता. त्यामुळे सेमी फायनलमध्ये भारताला जपानचे आव्हान जड जाणार असे वाटत होते. मात्र सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचा आक्रमक फळीने सामन्याचे चित्रच पालटले.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये 19 व्या मिनिटाला आकाशदीप सिंहने पहिला मैदानी गोल करत भारताचे गोलचे खाते उघडले. त्यानंतर अवघ्या 4 मिनिटाच म्हणजे 23 व्या मिनिटाला भारताला पेनाल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीत सिंहने जपानची गोलपोस्ट भेदत भारताचा दुसरा गोल केला.

यानंतर दुसऱ्या क्वार्टरचा खेळ संपत आला असतानाच मैदानी गोल करत भारताची आघाडी 3 - 0 अशी वाढवली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये तब्बल 3 गोल झाल्याने जपानची बचाव फळी बावचळली.

India Vs Japan
India Vs Ireland : इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार! भारताची मालिका 'या' वाहिनीवर पहिल्यांदाच लाईव्ह दिसणार

तिसऱ्या क्वार्टरमध्ये जपानने भारताचा गोलचा धडाका रोखण्यात काही मिनिटे यश मिळवले. मात्र 39 व्या मनिटिला पुन्हा एकदा जपानची गोलपोस्ट भेदण्यात भारताला यश आले. सुमितने 39 व्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताची आघाडी 4 - 0 अशी वाढवली.

यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये जपानने भारताचे आक्रमण थोपवून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र 51 व्या मिनिटाला सेल्वम कार्तीने मैदानी गोल करत भारताची आघाडी 5 - 0 अशी वाढली. अखेर भारताने जपानचा 5 - 0 असा पराभव करत दिमाखात फायनल गाठली.

भारताचा फायनलमध्ये मलेशियाची मुकाबला आहे. लीग स्टेजमध्ये मलेशिया 12 गुण घेऊन दुसऱ्या स्थानावर होती. मलेशिया सेमी फायनलमध्ये कोरियाचा 6 - 2 असा पराभव करत अंतिम फेरीत पोहचली आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com