Inspirational : कोरोनाला चारीमुंड्या चित करणारा लढवय्या...

मनाच्या कणखरतेवर आणि कठीण प्रसंगातही जिद्दीने मात करता येते यावरच आजचा विषय आधारित आहे.
Maruti Adkar
Maruti Adkar Sakal

साधारणत ; बारा वर्षांपुर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) मानसशास्त्र विभागाच्यावतीने एक सर्वेक्षण उपक्रम हाती घेण्यात आला होता. नैराश्यातुन विद्यार्थांच्या होणा-या आत्महत्या (Depression) असा सर्वेक्षणाचा विषय होता. या सर्वेक्षणाच्या दरम्यान एक बाब प्रकर्षाने निदर्शनास आली ती म्हणजे जे विद्यार्थी कुठल्याही क्रीडा प्रकारात सक्रीय असतात त्यां बहुतेकांच्या मनात आत्महत्येचे विचार येत नाही. कठीण प्रसंगातही हिमतीनं मात करणं, जिद्दीनं पुढे जाणे हा गुण त्यांच्यात विकसित होतो, जो आयुष्यभऱ त्यांना साथ देत राहतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या मुद्द्याचा आणि आजच्या विषयाचा संबंध काय ? तर मनाच्या कणखरतेवर आणि कठीण प्रसंगातही जिद्दीने मात करता येते यावरच आजचा विषय आधारित आहे.

कोरोना संसर्गाने (Corona) जगाचे तंत्र बदलले, जगण्याचे संदर्भ बदलले, जवऴचे, ओळखीचे, लांबचे अशा कितीतरी व्यक्ती कायमच्या निघुन गेल्या. अशाही स्थितीत ज्यांनी जगण्याची लढाई जिंकली अशा जिद्दीच्या, प्रेरणा देणा-या अनुभवांनी जगण्याची उभारी दिली. जवळच्या व्यक्ती गमावल्याचं दु:ख अनेकांना पचवता न आल्यानं कित्येकांनी स्वत:चे आयुष्य संपवले. कोरोनाच्या कचाट्यात अनेक क्रीडापटुही सापडले. पण नैराश्य, हतबलता याच्यावर मात करत पुन्हा उभे राहिले. यातीलच एक नाव म्हणजे माजी ऑलिंपियन कुस्तीपटु मारुती आडकर. (Maruti Adkar)

Maruti Adkar
उत्तर भारतातील पैलवान शाकाहारी का असतात?

महाराष्ट्राच्याच (Maharashtra) नाही तर देशाच्या कुस्तीमधलं आदाराने घेतलं जाणारे नाव. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय पंच. 1972 साली जर्मनीमध्ये झालेल्या ऑलिंपिंक स्पर्धेंत ते सहभागी झाले होते. पुण्यातल्या गुलशे तालमीत त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. आहार आणि व्यायामामुऴं शरीर सुरवातीपासुनच मजबुत होते. मात्र, जसजसा व्यायाम कमी झाला तसतशी शारिरीक क्षमता कमी होऊ लागली. अशातच 1980 च्या आसपास त्यांची ऍजिओप्लास्टी करण्यात आली. असे असले तरी मारुती आडकर थोडीच थांबणार होते. त्यांचा सराव, कुस्तीचे मार्गदर्शनाचे कार्य अव्याहत चालु होते.

Maruti Adkar
महिला अन् कुस्ती हे समीकरण समाजाला मान्य नव्हतं, पण...

2019 मध्ये जगाला कोरोना संसर्गाचा विळखा पडला. भारतातही पहीली लाट येऊन धडकली. मुळातच माणसांमध्ये रहायला, मिसळायला आडकरांना आवडायचे. अशाच बेसावध क्षणी त्यांना कोरोना संसर्गाने जखडायला सुरुवात केली. पैलवानाचे शरीर जरी असले तरी कोरोनाने भल्याभल्यांना नतमस्तक केले. पण मुऴातच लढवय्या बाणा असणा-या आडकरांनी हार माऩणे शक्यच नव्हते.

तो एक महिना भयानकच नाही तर संयम पाहणारा काळ

जवऴपास एक महीना आडकर रुग्णालयात झुंज देत होते. सुरवातीला सलाईन, मग ऑक्सिजन आणि नंतर आयसीयु टप्प्याटप्याने कोरोना त्यांच्यावर ढाक डाव टाकु पहात होता. आडकरांना कमालीचा अशक्तपणा आला होता. अशातच मधुमेह झाल्यामुळे उपचारांना मर्यादा पडत होत्या. खालावत जाणारी तब्येत पाहता त्यांना अतिदक्षता विभागात हलवणे क्रमप्राप्त होते. आपली तब्येत खराब होत चालली आहे याची पुर्ण जाणीव त्यांना होती. पण मन भक्कम होते. महीन्याभराच्या कालावधीत जवऴपास रोज आजुबाजुला रुग्ण मृत्युमुखी पडायचे. चांगला हसणारा, बोलणारा शेजारचा रुग्ण अचानक गेल्याने आजुबाजुच्या रुग्णांची मने खचुन जायची. रोजच असे घडत होते. पण हार न मानता त्यांनी मृत्युशी चिवट लढा दिला. त्यांच्या जगण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाही नामोहरम होऊ लागला. तो एक महीन्याचा काळ त्यांच्यासाठी भयानकच नाही त्यांच्या संयमाची परिसीमा पाहणारा होता.

अखेर कोरोनानेच हात टेकले...

आडकरांना कित्येक दिवस अन्नही जात नव्हते. हळुहळु ते उपचारांना प्रतिसाद देत होते. अतिदक्षता विभागातुन ते बाहेर आले. त्यानंतर काही दिवसात थोडेफार अन्नही खाऊ लागले. घरी आल्यानंतरही त्यांना अशक्तपणा जाणवायचा. पण आपण मृत्युवर मात करत बाहेर आलो आहोत. हा विचारच पुढच्या जगण्याला प्रेरणा देत रहायला. काही काळात त्यांचे जीवन पुन्हा पुर्ववत झाले आहे. रोजचा व्यायाम, आहार, भेटीगाठी, मल्लांना मार्गदर्शन करणे, आंतरराष्ट्रीय पंच असल्याने नविन पंच तयार करणे या आणि अशा अनेक उपक्रमांमध्ये वयाच्या बहात्तरीतही आडकर सक्रीय आहेत. कोरोनाचा तो एक महिन्याचा काळ आठवला तरी अंगावर काटा येतो असे म्हणणा-या या पैलवानाने जगण्याचा सर्वोच्च किताब पटकावत आपल्या मुगुटात मानाचा तुरा रोवला आहे हेच खरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com