ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाईची जागतिक स्पर्धेतून माघार | Mirabai Chanu Back out | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mirabai chanu

मीराबाई चानूचं लक्ष्य आशियाई क्रीडा स्पर्धा

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाईची जागतिक स्पर्धेतून माघार

sakal_logo
By
विराज भागवत

नवी दिल्ली : टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू हिने जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेमधून माघार घेतली आहे. उझबेकीस्तानमधील ताश्‍कंद येथे सात ते सतरा डिसेंबर या दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. याप्रसंगी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक विजय शर्मा म्हणाले की, २०२२ मध्ये आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये चीनचे दिग्गज खेळाडूही सहभागी होतील. मीराबाई चानूलाही आशियाई स्पर्धेत पदक जिंकायचे आहे. आता तिने हेच लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे, असेही त्यांनी पुढे स्पष्टपणे सांगितले.

हेही वाचा: IND vs NZ : अजिंक्य रहाणेवर संतापला VVS लक्ष्मण, म्हणाला...

विजय शर्मा पुढे म्हणाले की, मीराबाई चानू हिच्या स्नॅचमधील तंत्रामध्ये सुधार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्नॅचमधील तंत्रात लक्षणीय सुधारणा होण्यासाठी अवधी जाणार आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेमध्ये तिच्याकडून ज्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे, ती पूर्ण होऊ शकत नाही. याच कारणामुळे जागतिक स्पर्धेमधून मीराबाई चानूला माघार घ्यावी लागली आहे.

हेही वाचा: IND vs NZ Test: श्रेयसला संघात स्थान; रिकी पॉन्टींग म्हणतो...

mirabai chanu medal tokyo

mirabai chanu medal tokyo

दुखापतीवर लक्ष द्यावे लागेल

सध्या मीराबाई चानूच्या स्नॅच या खेळाच्या तांत्रिक बाबींवर लक्ष देत आहोत. स्नॅचमधील कामगिरीकडे लक्ष देत असलो तरी क्लीन आणि जर्क यामध्ये १०० ते १०५ किलेपेक्षा जास्त वजन उचलायला तिला देणार नाही. जर तुम्ही जास्त वजन उचलायला तयार नसाल तर दुखापत बळावते. याचमुळे मीराबाई चानूच्या दुखापतीवरही लक्ष द्यावे लागणार आहे, असे विजय शर्मा यावेळी सांगतात.

हेही वाचा: IND vs NZ : कानपूरच्या मैदानावर मुंबईकर क्रिकेटरचीच हवा!

राष्ट्रकुल स्पर्धेतील आव्हान सोपे

विजय शर्मा यांनी यावेळी नमूद केले की, मानांकनात नंबर वन स्थानावर असल्यामुळे मीराबाई चानू राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पात्र ठरू शकते. त्यामुळे तिला जागतिक स्पर्धेत खेळण्याची गरज नाही. ही स्पर्धा राष्ट्रकुल क्रीड स्पर्धेची पात्रता फेरी आहे. फेब्रुवारीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची पात्रता फेरी होणार आहे. या स्पर्धेत ती सरावासाठी सहभागी होऊ शकतो. पण मीराबाई चानूची गेल्या काही काळांतील कामगिरी पाहता तिला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मोठे आव्हान मिळणार नाही. ती या स्पर्धेत सहज सुवर्णपदक जिंकून शकते. आशियाई स्पर्धेमध्येच तिचा कस लागेल, असा पुढे त्यांनी सांगितले.

loading image
go to top