
INDW vs NZW, Women World Cup 2025
ESakal
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील महिला विश्वचषकातील २४ वा सामना गुरुवारी डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळला जात आहे. पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४९ षटकांत तीन गडी गमावून ३४० धावा केल्या. स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये २१२ धावांची भागीदारी झाली.