100 कसोटी खेळणारा टीम इंडियातला हा खेळाडू करणार निवृत्तीची घोषणा?

टीम इंडियाचा स्टार खेळाडू इशांत शर्मा लवकरच निवृत्तीची घोषणा करणार असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.
100 कसोटी खेळणारा टीम इंडियातला हा खेळाडू करणार निवृत्तीची घोषणा?
esakal

टीम इंडियाचा स्टार खेळाडू इशांत शर्मा लवकरच निवृत्तीची घोषणा करणार असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे. निवडकर्त्यांनी इंग्लंडविरुद्ध जुलै मध्ये होणाऱ्या पाचव्या टेस्ट मॅचमधून इशांत शर्माला वगळले आहे. गतवर्षी वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे ५ मॅचची टेस्ट सिरीज अर्ध्यात खेळवण्यात आली होती. आता उर्वरीत खेळ पूर्ण करण्यासाठी टी इंडिया इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे.

100 कसोटी खेळणारा टीम इंडियातला हा खेळाडू करणार निवृत्तीची घोषणा?
संघात स्थान मिळणं अन्... अर्जुन तेंडुलकरबाबत शेन बाँडचं मोठं वक्तव्य

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा टीम इंडियाच्या ताफ्यात पुन्हा स्थान मिळण्याचा मार्ग खडतर बनला आहे. इशांत शर्माने टीम इंडियासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर २०२१ मध्ये खेळला होता. अखेरची आयपीएल मे २०२१ मध्ये खेळीली होती.

खराब फॉर्म आणि फिटनेसच्या कारणामुळं इशांत शर्माला टीम इंडियाने बेंचवर बसवले आहे. आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनदरम्यान इशांतला कोणीच विचारलं नाही. त्यामुळे आता ईशांतसाठी टीम इंडियाचे दरवजे बंद झालं आहेत. इशांतने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ९३ सामने खेळले आहेत. यामध्ये ७२ विकेट्स घेतल्या आहे. १२ धावांवर ५ विकेट हे त्याचे बेस्ट गोलंदाजीचे प्रदर्शन आहे.

100 कसोटी खेळणारा टीम इंडियातला हा खेळाडू करणार निवृत्तीची घोषणा?
फिल्डिंग करताना डोक्याला गंभीर जखम, मैदानातच कोसळला इंग्लंडचा खेळाडू

टीम इंडियाची निवड आता मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांसारख्या वेगवान गोलंदाजांची त्रिकूट बनली आहे. चौथा वेगवान गोलंदाज म्हणून उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर हे भारतीय निवडकर्त्यांचे आवडते बनले आहेत. त्यामुळे आता इशांत शर्माला टीम इंडियात पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धुसर बनली आहे.

इशांत शर्मा अखेरचा नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत दिसला होता. त्या सामन्यात इशांत शर्माला एकही विकेट मिळवता आली नाही.

इशांत शर्माच्या कारकिर्दीची उलटी गिनती आधीच ऑगस्ट 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर सुरू झाली होती, जेव्हा त्याने 3 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 5 विकेट घेतल्या होत्या. टीम इंडियामध्ये स्पर्धा सातत्याने वाढत आहे.

मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह सारखे गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. अशा परिस्थितीत इशांत शर्माला टीम इंडियातून डच्चू मिळू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com