esakal | विराटच्या नेतृत्वाखाली मॅच फिक्सिंग? ICCची महत्त्वाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs eng

विराटच्या नेतृत्वाखाली मॅच फिक्सिंग? ICCची महत्त्वाची माहिती

sakal_logo
By
सुशांत जाधव

दुबई : भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध खेळलेले सामने फिक्स नव्हते, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (International Cricket Council) म्हटले आहे. इंग्लंड (2016) आणि आस्ट्रेलिया (2017) विरुद्ध भारतीय संघाचे सामने फिक्स होते, असा दावा अल जजीरा चॅनेलने केला होता. जो दाखला दिला तो कल्पनेपलीकडचा असून सामन्यात फिक्सिंगचा कोणताही प्रकार घडला नाही, असे आयसीसीने सोमवारी स्पष्ट केले. अल जजीराने 2018 मध्ये एक डॉक्यूमेंट्री प्रसारित करण्यात आली होती. ‘क्रिकेट्स मॅच फिक्सर्स' या शिर्षकाखालील डॉक्यूमेंट्रीच्या माध्यमातून 2016 मध्ये चेन्नईमध्ये इंग्लंड विरुद्धचा सामना आणि 2017 मध्ये रांची येथील आस्ट्रेलिया विरुद्धचा सामना फिक्स होता, असा दावा करण्यात आला होता.

हेही वाचा: बार्सिलोना महिला संघाने रचला इतिहास!

आयसीसीने या प्रकरणात चॅनेलने दाखवलेल्या पाच लोकांनाही क्लीन चिट दिलीये. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्या तरी त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे आयसीसीने सांगितले. कार्यक्रमामध्ये कथित सट्टेबाज अनील मुनव्वर फिक्सिंगचा इतिहास सांगताना विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील दोन मॅच फिक्स असल्याचा दावा करताना दाखवण्यात आले होते. आयसीसीने या दोन प्रकरणाची चौकशी केली होती. पण तो दावा फोल ठरला.

हेही वाचा: भारतीय वंशाच्या खेळाडूची ऑस्ट्रेलियन संघात वर्णी

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, या दाव्यानंतर प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली होती. चार वेगवेगळ्या सदस्यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. त्यांच्या अहवालात कोणत्याही प्रकारे फिक्सिंग झाल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. ज्या लोकांना क्लीन चिट दिली गेली त्यांच्या नावाचा खुलासा आयसीसीने केलेला नाही. यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटर हसन रजा, श्रीलंकेचा थरंगा आणि थारिंडु मेंडिस यांचा समावेश असल्याचे बोलले जाते.

डॉक्यूमेंट्रीच्या माध्यमातून जो दावा करण्यात आला तो फोल ठरला. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने या प्रकरणात पाच जणांची चौकशी केली. पण त्यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध होत नव्हता. डॉक्युमेंट्रीही ठोस पुराव्याच्या अभाव जाणवतो. त्यात कोणतेही तथ्य नाही, हे तपासात समोर आल्याचे आयसीसीने म्हटले आहे.