विराट-रोहितशिवाय टीम इंडिया लंकेला जाणार? असा असेल प्लॅन B

सामने कोणत्या ठिकाणी खेळवण्यात येणार यासंदर्भात कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Rohit Sharma
Rohit Sharmagoogle

इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघामध्ये 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्याची मालिका नियोजित आहे. वनडे मालिकेनं भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारतीय संघ श्रीलंकेला जाणार आहे. ईएसपीएनच्या वृत्तानुसार पहिला वनडे सामना 13 जुलै रोजी खेळवण्यात येणार असून 27 जुलैपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. सामने कोणत्या ठिकाणी खेळवण्यात येणार यासंदर्भात कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Rohit Sharma
WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, असा आहे संघ

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जून ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या या फायनल लढतीनंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळणार आहे. या मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून याची सांगता ही 14 सप्टेंबरला होणार आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेत बिझी असताना श्रीलंका दौऱ्यासाठी वेळ हा खूपच कमी असून मर्यादित षटकांसाठी विराट-रोहित आणि पंतशिवाय भारताची B टीम मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

Rohit Sharma
कर्णधार-उपकर्णधारानं मुंबईत घेतला लशीचा पहिला डोस

असा असेल भारताचा श्रीलंका दौरा

13 जुलै – पहिला वनडे सामना

16 जुलै – दुसरा वनडे सामना

19 जुलै – तिसरा वनडे सामना

22 जुलै – पहिला टी 20 सामना

24 जुलै – दूसरा टी 20 सामना

27 जुलै – तिसरा टी 20 सामना

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे मर्यादित षटकांसाठी टीम बी श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेशिवाय श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघाचे नेतृत्व कोणाकडे देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अनुभवी शिखर धवन कसोटी संघाचा सदस्य नाही. त्यामुळे श्रीलंका दौऱ्याची मदार त्याच्याकडे दिली जाऊ शकते.

श्रीलंका दौऱ्यासाठी असा असू शकतो भारतीय संघ

शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, पृथ्वी शॉ, दीपक चाहर, राहुल चाहर, जयदेव उनादकट, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, आणि राहुल तेवतिया.

Indias tour of Sri Lanka in July to comprise three ODIs three T20Is Without virat rohit

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com