भारताचा पॅलेस्टाईनवर विजय ;आशियायी करंडकाच्या पात्रतेसाठी प्रतिक्षा

सामन्यातील निकालाची वाट पाहावी लागणार आहे.
Krida
KridaSakal

जेदाह : दोन दिवसापूर्वी यजमान सौदी अरेबियाकडून (Saudi Arabia) पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताच्या पुरुष बास्केटबॉल (Basketball) संघाने पॅलेस्टाईनचा ७९-७७ असा पराभव केला. मात्र आशियायी (Asia) करंडक स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी त्यांना सौदी अरेबिया-पॅलेस्टाईन यांच्या सामन्यातील निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

सौदीविरुद्धच्या सामन्यात निराशा केल्यानंतर भारतीयांनी या सामन्यात बहारदार खेळी करत, पात्रतेच्या आशा कायम ठेवल्या. सुरवातीच्या ३४ मिनिटांमध्ये पॅलेस्टाईन आघाडीवर होते,परंतु पुढील सत्रात दाखवलेल्या जिगरबाज खेळीमुळे भारताने दोन गुणांनी विजय मिळविला.आगामी सामन्यात जर सौदी अरेबियाने विजय मिळविला तर भारताचा आशियायी करंडकाचा मार्ग मोकळा होणार आहे.त्यानंतरच त्यांचा पूर्वी पात्र ठरलेल्या १३ संघांमध्ये त्यांचा समावेश होईल. कोरोनामुळे स्थगित झालेली ‘फिबा आशियायी करंडक’ स्पर्धा २०२२ नियोजित आहे.

Krida
बांधकाम क्षेत्रात गुणवत्तापूर्ण सेवा व गुंतवणुकीची मोठी संधी ः क्रेडाईचे नियोजित राज्याध्यक्ष सुनील फुरडे

निकाल - भारत विजयी (अम्रीतपाल सिंग ३०,अमज्योत सिंग २३,जोगिंदर सिंग १२,सहाजी सिखोन ७) पराभूत पॅलेस्टाईन (किंडल डाइक्स ३२,सनी सककिनी २२)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com