INDvENG : अश्विननं चौकार मारला आणि सिराजचा आनंद गगनाला भिडला (VIDEO)

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 15 February 2021

ड्रेसिंग रुमध्ये सर्वांनी उभे राहून अश्विनच्या शतकी खेळीला दाद दिली. अश्विनने त्याच्या अंदाजात शतकी सेलिब्रेशन केले. पण..

India vs England, 2nd Test : चेन्नईत सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दुसरा डाव  286 धावांत आटोपला. पहिल्या डावातील 198 धावांच्या आघाडीसह टीम इंडियाने पाहुण्या इंग्लंडसमोर 482 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले आहे. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर चौथ्या डावात हा पल्ला गाठणं खूपच कठिण आहे.

पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या अश्विनने तिसरा दिवस फलंदाजी करुन गाजवला. डावातील 83 व्या षटकातील  मोईन अलीच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचत अश्विन 97 धावांवर पोहचला. चौथ्या चेंडूवर त्याने दोन धावा घेतल्या. आणि याच षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार खेचत त्याने पाचवे कसोटी शतक झळकावले.

INDvsENG: शतकी पंचसह घरच्या मैदानावर अश्विननं केली 'हवा'; कळलं का भावा!

ड्रेसिंग रुमध्ये सर्वांनी उभे राहून अश्विनच्या शतकी खेळीला दाद दिली. अश्विनने त्याच्या अंदाजात शतकी सेलिब्रेशन केले. पण चर्चा रंगली ती त्याच्या शतकानंतर आनंद व्यक्त करणाऱ्या नॉन स्ट्राईकवर असलेल्या मोहम्मद सिराजची. मोहम्मद सिराजनं अश्विनच्या शतकानंतर उड्या मारुन आनंद साजरा केला. सहकऱ्याच्या शतकाचा अभिमानानं आनंद साजरा करणाऱ्या मोहम्मद सिराजचा आणि अश्विनचा तो क्षण खूप काही सांगून जाणारा होता. बीसीसीआयने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन या खास क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

विक्रम पाहून मीच चक्रावतो : अश्विन

अश्विननं 148 चेंडूत 106 धावांची दमदार खेळी केली. या शतकी खेळीत त्याने 14 चौकार आणि 1 षटकार खेचला. मोहम्मद सिराजने अखेरच्या टप्प्यात फटकेबाजीही केल्याचे पाहायला मिळाले. सिराजने 2 षटकाराच्या मदतीने 21 चेंडूत 16 धावा केल्या. अश्विन आणि विराट यांच्यातील भागीदारीमुळे टीम इंडियाला पाहुण्या इंग्लंडसमोर मोठे आव्हान ठेवता आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDvENG 2nd Test mohammed siraj celebrate ravichandran ashwin century Watch Video