कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून हटविल्यानंतर धोनीचे 'बॅक टू बेसिक'!

वृत्तसंस्था
Friday, 17 January 2020

विश्वकरंडकानंतर त्याने एकही सामना खेळलेला नाही. अशातच गुरुवारी (ता.16) बीसीसीआयने करार श्रेणीतून त्याला वगळल्यावर त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु झाल्या.

रांची : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कोणत्याही क्रिकेट श्रेणीत स्थान न दिल्यामुळे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले. मात्र, या एकीकडे या चर्चा सुरु असतानाच धोनीने झारखंड रणजी संघासोबत सरावाला सुरवात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

''तो येऊन संघासोबत सराव करणार आहे याची आम्हालाही कल्पना नव्हती. आमच्यासाठी हे खूप छान सरप्राईज होतं. त्याने नेहमीच्या ट्रेनिंगनंतर काहीवेळ फलंदाजीचा सराव केला,'' असे झारखंड संघाच्या विश्वासू सूत्रांनी सांगितले. 

- Asia Cup : भारताच्या नकारामुळे पाकला गमवावे लागले यजमानपद!

विश्वकरंडकानंतर त्याने एकही सामना खेळलेला नाही. अशातच गुरुवारी (ता.16) बीसीसीआयने करारश्रेणीतून त्याला वगळल्यावर त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु झाल्या. आता त्याचे परतण्याचे सर्व मार्ग संपले असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच त्याने सरावाला पुन्हा सुरवात केली आहे. 

- टीम इंडियाच्या वयस्कर चाहत्या चारुलता यांचे निधन

त्याने आयपीएलसाठी सरावाला सुरवात केली असल्याची शक्यता आहे. त्याने टी-20 विश्वकरंडाकासाठी संघात पुनरागमन केले तर त्याला बीसीसीआयच्या नियामांनुसार 'क' श्रेणीत सहभागी करुन घेतले जाईल.

- रोहित शर्माला 'वनडे'तील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा, तर विराट कोहलीला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni has started practice with the Jharkhand Ranji team