INDvsAUS : किंग कोहलीच्या नावावर जमा झाले तीन अनोखे कारनामे!

टीम ई-सकाळ
Friday, 17 January 2020

76 चेंडूंमध्ये 6 चौकारांच्या मदतीने त्याने 78 धावांची खेळी साकारली.

राजकोट : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीला टीम इंडियाची रणमशिन संबोधले जाते. प्रत्येक सामन्यागणिक तो कोणते ना कोणते रेकॉर्ड बनवत निघाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑस्ट्रेलियाविरुद्ध राजकोट येथे सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्याने आपल्या नावावर तीन अनोखे रेकॉर्ड नोंदविले आहेत. यापैकी दोन रेकॉर्ड त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण ठरावा, असे असून तिसरा रेकॉर्ड त्याच्या चाहत्यांसाठी नाक मुरडण्यासारखा आहे.

- कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून हटविल्यानंतर धोनीचे 'बॅक टू बेसिक'!

किंग कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4000 धावा ठोकल्या असून तो या यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात कमी सामन्यात 4000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी विराजमान आहे. 

सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4000 धावांचा टप्पा 83 डावांत पार केला होता. तर विराट कोहलीने 86 डावांत ही कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्डस् यांनी 87 डावांमध्ये तर ब्रायन लारा यांनी 89 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. 

- Asia Cup : भारताच्या नकारामुळे पाकला गमवावे लागले यजमानपद!

आपल्या तळपत्या बॅटने धावांची बरसात करणाऱ्या विराटने एकदिवसीय सामन्यांत 1100 चौकार फटकावले आहेत. त्याने पहिला चौकार चमिंडा वासच्या गोलंदाजीवर लगावल्यानंतर सुरू झालेला हा महिमा आता 1100 पर्यंत पोहोचला आहे. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर चौकार लगावत त्याने 1100 चौकारांचा टप्पा गाठला. याबरोबर असा पराक्रम करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.

आणखी एक रेकॉर्ड कोहलीच्या नावे जमा झाला आहे. मात्र, तो त्याच्यासाठी तसेच त्याच्या चाहत्यांसाठी काळजी वाढवणारा असा आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झॅम्पा हा विराटसाठी वेळोवेळी डोकेदुखीच ठरत आला आहे. 8 सामन्यांत झॅम्पाचा सामना करताना कोहलीने 119 चेंडू टोलवताना 151 धावा फटकावल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 126.9 इतका असून सरासरी 30.2 अशी राहिली आहे. मात्र, तो सर्वाधिक 5 वेळा झॅम्पाचा बळी ठरला आहे. 

- टीम इंडियाच्या वयस्कर चाहत्या चारुलता यांचे निधन

दरम्यान, शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या स्थानी फलंदाजीसाठी मैदानात उतरत कोहलीने अर्धशतकी खेळी साकारली. 76 चेंडूंमध्ये 6 चौकारांच्या मदतीने त्याने 78 धावांची खेळी साकारली. मात्र, झॅम्पाला एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. स्टार्कने सीमारेषेवर त्याचा सुंदर झेल टिपला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDvsAUS Indian captain Virat Kohli made new records against Australia