esakal | INDvsENG : जगातील सर्वांत मोठ्या मैदानावर रंगणाऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs eng, Virat Kohli, Rohit Sharma, Mayank Agarwal, Shubman Gill, Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane , KL Rahul, Hardik Pandya, Rishabh Pant, Wriddhiman Saha, R Ashwin, Kuldeep Yadav, Axar Patel, Washington Sundar, Ishant Sharma, Jasprit Bumrah,Siraj

चेन्नईच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील मोठ्या विजयासह भारतीय संघाने मालिकेत बरोबरी साधली आहे.

INDvsENG : जगातील सर्वांत मोठ्या मैदानावर रंगणाऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

चेन्नईतील कसोटी सामन्यानंतर अहमदाबादच्या मैदानात रंगणाऱ्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 17 सदस्यीय संघ मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. चेन्नईच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील मोठ्या विजयासह भारतीय संघाने मालिकेत बरोबरी साधली आहे. उर्वरित दोन्ही कसोटी सामने जगातील सर्वात मोठ्या अशा अहमदाबाद येथील स्टेडियमवर रंगणार आहे. यासाठी टीम इंडियाने भारतीय संघाची घोषणा केली आहे.  

फाफ डुप्लेसीची कसोटीमधून निवृत्ती; कारणही केलं स्पष्ट

असा आहे भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.