esakal | INDvsNZ : कसोटी संघाची घोषणा; 15 महिन्यांनंतर 'या' खेळाडूचे पुनरागमन
sakal

बोलून बातमी शोधा

cricket

संघ पुढीलप्रमाणे : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, रिषभ पंत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, ईशांत शर्मा.

INDvsNZ : कसोटी संघाची घोषणा; 15 महिन्यांनंतर 'या' खेळाडूचे पुनरागमन

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी आज (मंगळवार) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, सलामीवीर पृथ्वी शॉ याने 15 महिन्यांनंतर संघात पुनरागमन केले आहे. तर, वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला तंदुरुस्ती चाचणी देण्याच्या अटीवर संघात स्थान देण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून, पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने व्हाईटवॉश दिला आहे. त्यानंतर आता तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. यानंतर 21 फेब्रुवारीपासून कसोटी मालिका होणार आहे. यातील पहिला सामना 21 ते 25 फेब्रुवारीदरम्यान वेलिंग्टनला होणार आहे. तर, दुसरा सामना 29 फेब्रुवारीपासून ख्राईस्टचर्च येथे खेळविला जाईल.

भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे कायम असून, अजिंक्य रहाणे उपकर्णधार असणार आहे. पाचव्या टी-20 सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. तर, केएल राहुल यालाही कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. यामुळे आता भारतीय संघात मयांक अगरवास, पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल या तीन नव्या सलामीवीरांचा समावेश असणार आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला प्रथमच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. 

पृथ्वीचे 15 महिन्यांनंतर पुनरागमन
उत्तेजक द्रव सेवन चाचणीत दोषी आढळल्याने आठ महिन्यांची बंदी झेलावी लागलेला पृथ्वी 15 महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करत आहे. त्याने बंदीनंतर पहिल्याच सामन्यात 39 चेंडूत 63 धावांची खेळी केली होती. त्याच स्पर्धेत त्याने दोन अर्धशतके झळकाविली होती. पृथ्वीने आपला अखेरचा कसोटी सामना वेस्टइंडीजविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात सहभागी केले होते. पण, खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर जावे लागले होते.

संघ पुढीलप्रमाणे : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, रिषभ पंत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, ईशांत शर्मा.