INDvsNZ : बॉलिंगमध्ये जमलं नाही; पण बॅटिंगमध्ये सैनीची 'नवदीप' कामगिरी!

टीम ई-सकाळ
Saturday, 8 February 2020

दुसऱ्या वन-डे सामन्याआधी सैनीने काल नेटमध्ये बॅटिंगची जोरदार प्रॅक्टीस केली होती. त्याचा रिझल्ट आजच्या मॅचमध्ये दिसून आला.

INDvsNZ : ऑकलंड (न्यूझीलंड) : येथे झालेल्या दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये न्यूझीलंडने भारताचा 22 रन्सनी हरवत मालिकाही खिशात घातली. याअगोदर झालेली टी-20 सीरिज 5-0 ने जिंकणाऱ्या भारतीय संघाला वन-डे मालिका गमवावी लागली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विजयासाठी दिलेलं 274 रन्सचे टार्गेट गाठताना टीम इंडिया 251 धावांपर्यंतच पोहचू शकली. श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा आणि नवदीप सैनी यांनी निकराने किल्ला लढवला, पण ते टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. 

- INDvsNZ : जिंकता जिंकता हरला; पण जडेजाने कपिल देव अन् धोनीचा 'तो' विक्रम मोडला!

पृथ्वी शॉ (24), मयांक अगरवाल (3), विराट कोहली (15), के.एल.राहुल (4), केदार जाधव (9) ही आघाडीची फळी लवकर माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरने 57 बॉलमध्ये 7 फोर आणि 1 सिक्सच्या जोरावर 52 रन्सची अर्धशतकी खेळी केली. पण मोठा फटका मारण्याच्या नादात तो आऊट झाला. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि नवदीप सैनी यांनी 76 रन्सची भागीदारी करत मॅचमध्ये रंगत आणली. 

टीम इंडियाचा वेगवान बॉलर मोहम्मद शमीऐवजी टीममध्ये संधी मिळालेल्या नवदीप सैनीला बॉलिंगमध्ये करिष्मा करता आला नाही. मात्र, त्याने ही कसर बॅटिंगमधून भरून काढली. बॉलिंगमध्ये 10 ओव्हर टाकताना 48 धावा न्यूझीलंडच्या झोळीत टाकलेल्या सैनीने बॅटिंग करताना 49 बॉलमध्ये 45 रन्स फटकावल्या. यामध्ये त्याने 5 फोर आणि 2 सिक्सही ठोकले. 

- 'यशस्वी' हिरा कसा व कुठे सापडला, त्याची कथा...!

बॅटिंगमध्ये आपला करिष्मा दाखवताना सैनीने एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावे केला आहे. SENA (दक्षिणपूर्व, पूर्व आणि उत्तर आशिया) देशांदरम्यान जे आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेट सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये नवव्या क्रमांकावर बॅटिंग करताना सर्वाधिक रन्स करणारा सैनी हा दुसरा बॅट्समन ठरला आहे. या यादीत टीम इंडियाचेच माजी खेळाडू मदनलाल यांनी इंग्लंडविरुद्ध नाबाद 53 (1982) रन्स ठोकल्या होत्या. तर हरभजन सिंगने केनियाविरुद्ध 37 रन्स (2001) केल्या होत्या.

- Video : 'या' खेळाडूंनी खाल्ली 'माही स्पेशल' पाणीपुरी!

दरम्यान, नवदीपने केलेल्या या फटकेबाजीनंतर बीसीसीआयने त्याचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. दुसऱ्या वन-डे सामन्याआधी सैनीने काल नेटमध्ये बॅटिंगची जोरदार प्रॅक्टीस केली होती. त्याचा रिझल्ट आजच्या मॅचमध्ये दिसून आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDvsNZ Navdeep Saini wins hearts with entertaining knock against New Zealand