INDvsNZ : जिंकता जिंकता हरला; पण जडेजाने कपिल देव अन् धोनीचा 'तो' विक्रम मोडला!

Ravindra-Jadeja
Ravindra-Jadeja

INDvsNZ : ऑकलंड (न्यूझीलंड) : येथे झालेल्या दुसरा वन-डे सामना न्यूझीलंडने जिंकत मालिकाही खिशात घातली. विजयासाठी दिलेलं 274 रन्सचे टार्गेट गाठताना टीम इंडिया 251 धावांपर्यंतच पोहचू शकली. श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा आणि नवदीप सैनी यांनी निकराने किल्ला लढवला, पण त्यांना 22 रन्सनी हार पत्करावी लागली. 

श्रेयस अय्यर (52) नंतर जडेजाने सैनीला साथीला घेत आठव्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचली. पण किवीज बॉलरनी टीम इंडियाला विजयापासून रोखले. आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. 

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये केलेल्या अर्धशतकाची आठवण जडेजाने आज पुन्हा करून दिली. दोन फोर आणि एक सिक्स टोलवत त्याने 55 धावा केल्या. यावेळी त्याने भारताचे माजी विश्वविजेते कॅप्टन ठरलेल्या महेंद्रसिंह धोनी आणि कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला आहे. वन-डेमध्ये सातव्या क्रमांकावर बॅटिंग करताना सर्वात जास्त वेळा अर्धशतके ठोकण्याचा बहुमान आता जडेजाला मिळाला आहे. 

पृथ्वी शॉ (24), मयांक अगरवाल (3), विराट कोहली (15), के.एल.राहुल (4), केदार जाधव (9) ही आघाडीची फळी लवकर माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरनं आपल्या खांद्यावर जबाबदारी पेलली. 57 बॉलमध्ये 7 फोर आणि 1 सिक्सच्या जोरावर त्याने 52 रन्सची अर्धशतकी खेळी केली. पण मोठा फटका मारण्याच्या नादात तो आऊट झाला. त्यानंतर टीम इंडियाच्या तारणहाराची भूमिका बजावणाऱ्या रविंद्र जडेजा आणि नवदीप सैनी यांनी 76 रन्सची भागीदारी करत मॅचमध्ये रंगत आणली. 

पण कायले जेमिसनने ही जोडी फोडत भारताच्या तोंडून विजय हिरावून घेतला. जडेजासोबत सैनीनेही टोलेबाजी करताना 49 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्सच्या जोरावर 45 रन्सची चांगली खेळी केली. त्यानंतर चहलने 12 बॉलमध्ये 10 रन्सचे योगदान देत तोही आऊट झाला.

दरम्यान, सातव्या क्रमांकावर बॅटिंग करताना जडेजाने आतापर्यंत 7 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने कपिल देव आणि महेंद्रसिंह धोनी (प्रत्येकी 6) यांना मागे टाकले आहे. न्यूझीलंडविरुद्ध जडेजाची बॅट चांगलीच तळपते हे गेल्या 5 मॅचमधील त्याच्या कामगिरीवरून दिसून येते. फक्त एक मॅच वगळता जडेजाने चार अर्धशतके झळकावली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com