Video : धोनी म्हणतोय, 'पाणीपुरीला वेळ लागेल'; 'या' खेळाडूंनी खाल्ली 'माही स्पेशल' पाणीपुरी!

टीम ई-सकाळ
Thursday, 6 February 2020

आयपीएलच्या ऑल स्टार मॅचमध्येही धोनी खेळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जर तो या मॅचमध्ये खेळला तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना पुन्हा धोनीच्या कॅप्टनशिपखाली खेळावं लागणार आहे.

माले : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असला तरी तो त्याच्या फॅन्स आणि मित्रांपासून दूर नाहीय. अधूनमधून त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असतात. सध्या त्याचा आणखी एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या धोनी मालदीवमध्ये सुटी एन्जॉय करत असून तेथीलच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी पाणीपुरीवाल्याचा भूमिकेत असून तो टीम इंडियातील टीममेट्सना ही पाणीपुरी खायला घालत असल्याचे दिसत आहे. टीम इंडियातील माजी डावखुरा वेगवान गोलंदाज आरपी सिंह आणि फिरकीपटू पियूष चावला यांना माहीच्या हातची पाणीपुरी खायला मिळाली असल्याने नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक करत तुम्ही नशीबवान आहात अशा प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत.

- ...याच कारणासाठी टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा भरावा लागला दंड!

पाणीपुरीचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. तिथे उभ्या असलेल्या आरपी सिंहलाही अशीच घाई झाल्याने त्याने धोनीकडे लवकर पाणीपुरी बनव असा हट्ट धरला. पण, 'थोडा वेळ थांब. वेळ लागेल,' असे म्हणत त्याने आरपीला पाणीपुरी बनवून दिली. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. 

- ...म्हणून बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या पेमेंटमध्ये कपात!

गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर धोनी मैदानापासून लांब गेला आहे. तो आता कधी परतणार याचीच वाट त्याचे फॅन्स पाहत आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, कॅप्टन विराट कोहली, कोच रवी शास्त्री यांनीही धोनीच्या कमबॅकबद्दल काहीच स्पष्ट केले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 स्पर्धेत धोनी संघात असणार का? हादेखील मोठा सस्पेन्स कायम आहे. मात्र, त्या अगोदर धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना दिसेल.

- भारतीय गोलंदाजांनो आगोदर ग्राऊंडबद्दल जाणून घ्या; प्रशिक्षकांचे मत

तसेच आयपीएलच्या ऑल स्टार मॅचमध्येही धोनी खेळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जर तो या मॅचमध्ये खेळला तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना पुन्हा धोनीच्या कॅप्टनशिपखाली खेळावं लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni serves Pani Puri to RP Singh and Piyush Chawla in party at Maldives