esakal | कसोटीसाठी मिताली ब्रिगेडला अजिंक्यने दिल्या खास टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

Ajinkya Rahane and Mithali Raj & Co

कसोटीसाठी मिताली ब्रिगेडला अजिंक्यने दिल्या खास टिप्स

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय पुरुष संघासोबतच महिला क्रिकेट संघही इंग्लंड दौऱ्यावर आहे. सात वर्षानंतर भारतीय महिला संघ इंग्लंडमध्ये एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला कसोटीसाठी भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनं खास टिप्स दिल्या. टेस कसोटीसाठी दिलेल्या या टिप्स मिताली राजच्या संघाला अजिंक्य कामगिरी करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, अजिंक्य रहाणेनं भारतीय महिला संघाला मार्गदर्शन करावे, यासाठी महिला संघाचे कोच रमेश पोवार यांनी पुढाकार घेतला होता. (Ajinkya Rahane offers Test batting tips to Mithali Raj & Co ahead of England Test)

रमेश पोवार आणि अजिंक्य रहाणे एकत्र खेळले आहेत. त्यामुळे सात वर्षानंतर कसोटी खेळणाऱ्या महिला संघाला अंजिक्य रहाणेचे ट्रेनिंग सेशन महत्त्वपूर्ण ठरेल, असा रमेश पोवार यांना विश्वास वाटतो. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य रहाणेनं ऑनलाईनच्या माध्यमातून महिला क्रिकेट संघाला कसोटीसाठी उपयुक्त गोष्टीचे मार्गदर्शन केले. मुंबईमध्ये क्वारंटाईन असतानाच हे सत्र घेण्यात आल्याची माहित आता समोर आली आहे. बुधवार पासून भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला यांच्यातील कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

हेही वाचा: WTC Final : सिराजला प्लेइंग XI मध्ये संधी?

कर्णधार मिताली राज, उप-कर्णधार हरमनप्रित कौर, स्मृती मानधनासह संघातील अन्य महिला फलंदाजांनी अजिंक्य रहाणेच्या स्पेशल सत्रात सहभाग घेतला होता. इंग्लंडच्या खेळपट्टीवर चेंडू अधिक स्विंग होतो त्यामुळे डावाच्या सुरुवातीला ड्राइव्ह शॉटवर भर देणे टाळा, चेंडू शरीराजवळ खेळण्याचा प्रयत्न करा असा सल्ला अजिंक्यने मितालीच्या महिला ब्रिगेडला दिलाय. स्विंग चेंडूवर कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा मोह होतो, पण तो रोखता यायला हवा, असे त्याने महिला खेळाडूंना सांगितले आहे.

हेही वाचा: ICC Ranking : इंग्लंडचा नमवत किवींनी टीम इंडियाला दिला दणका

छोटे छोटे टार्गेट सेट करुन मोठी धावसंख्या उभारण्यावर भर द्या. 15, 25...अशा टप्प्याने लक्ष्य वाढवत रहा, याचा संघाला आणि तुम्हाला फायदा होईल, असा सल्लाही अजिंक्यने महिला क्रिकेट संघाला दिलाय. या सत्रावेळी हरमनप्रीतने फलंदाजीवेळी मानसिकता कशी ठेवावी, असा प्रश्न विचारला होता. भागीदारी करत असताना समोरच्याशी संवाद साधा, खेळताना फोकस कायम राहिल यावर भर द्या, असे अंजिक्यने महिला संघाला सांगितले.

loading image
go to top