गोंधळामुळे स्नेह राणाची शतकी संधी हुकली; मितालीचा खुलासा

खेरच्या दिवशी मैदानातील पंचांनी वेळेपूर्वी सामना स्थगित केल्यामुळे स्नेह राणाची शतकी संधी हुकली होती.
Sneh Rana and Mithali Raj
Sneh Rana and Mithali RajBCCI Twitter
Updated on

ब्रिस्टेन : भारतीय महिला संघाने इंग्लंड विरुद्धच्या (INDW vs ENGW) एकमात्र कसोटी सामना अनिर्णित राखला. 16 ते 19 दरम्यान रंगलेल्या या सामन्यात पाच वर्षानंतर भारतीय संघात स्थान मिळालेल्या स्नेह राणाने (Sneh Rana) कसोटीत दमदार पदार्पण केले. गोलंदाजी आणि फलंदाजीत तिने मोलाचे योगदान दिले. दुसऱ्या डावात तिने केलेल्या नाबाद 80 धावांच्या जोरावरच भारतीय महिलांना सामना अनिर्णत राखता आला. अखेरच्या दिवशी मैदानातील पंचांनी वेळेपूर्वी सामना स्थगित केल्यामुळे स्नेह राणाची शतकी संधी हुकली होती. (INDW vs ENGW Mithali Raj Says Sneh Rana And Indian Women Team Wanted To Continue In Test Match)

इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी वर्ल्चुअल प्रेस कॉन्फरन्समध्ये भारतीय कर्णधार मिताली राजने यासंदर्भातील नाराजी बोलून दाखवलीये. मिताली म्हणाली की, आम्ही पुढे खेळायचे ठरवले होते. यासंदर्भात इंग्लंडच्या कॅप्टन्सी चर्चाही साधली होती. मैदानातील पंचांनी बेल्स पाडल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला.

Sneh Rana and Mithali Raj
स्नेह-तानियाची शतकी 'सफेदी'; इंग्लंडमध्ये व्हाइट जर्सीवरचा 'डाग' टळला

अंधूक प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आल्याचे अंपायर्संनी आम्हाला सांगितले. त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांना अभिनंदन करण्यास सुरुवात केली. अखेरच्या दिवसाचा खेळ संपला असेच मानण्यात आले, असे स्नेह राणाने ड्रेसिंग रुममध्ये आल्यावर सांगितल्याचा किस्साही मितालीने शेअर केला.

महिलांचा कसोटी सामना हा 4 दिवसांचा खेळवण्यात येतो

इंग्लंड महिलांनी पहिल्या डावात 9 बाद 396 धावा केल्या होत्या. या धावांच्या प्रत्युउत्तरा दाखल पहिल्या डावात भारतीय संघाने दमदार सलामी दिली. स्मृती मानधना आणि शफाली वर्माने अर्धशतकासह शतकी भागीदारी केली. पण या दोघी तंबूत परतल्यानंतर भारतीय महिला संघाचा डाव कोलमडला. पहिल्या डावात 231 धावांत संघ गारद झाला. इंग्लंडच्या महिलांनी भारतीय महिलांना फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात भारतीय संघाने 8 बाद 344 धावा करत सामना अनिर्णित राखत इंग्लंडमधील अपराजित राहण्याचा विक्रम अबाधित ठेवला.

Sneh Rana and Mithali Raj
महिला क्रिकेट जगतात अधिराज्य गाजवण्याची क्षमता असणारी शफाली

5 महिला क्रिकेटर्सचे पदार्पण

सात वर्षानंतर कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडच्या मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघात 5 जणींनी कसोटी पदार्पण केले. यात दिप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, शफाली वर्मा, तानिया भाटिया आणि स्नेह राणा हिचा समावेश होता. शफालीनं दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली. तर स्नेह राणाने 4 विकेटसह दुसऱ्या डावात 801 धावांची दमदार खेळी करुन लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com