Sports News : 'या' शहरात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं 'स्पोर्टस् क्लब'; स्टेडियमवर होणार आयपीएलचे सामने?

ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून दादोजी कोंडदेव स्टेडियमकडे (Dadoji Konddev Stadium) पाहिले जाते.
Cricket Sports
Cricket SportsSakal
Summary

बीसीसीआयच्या नियमावलीनुसार ही खेळपट्टी तयार केल्यामुळे या मैदानावर रणजी क्रिकेट सामने खेळवणे शक्य झाले.

ठाणे : ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून दादोजी कोंडदेव स्टेडियमकडे (Dadoji Konddev Stadium) पाहिले जाते. या स्टेडियममध्ये प्रीमियर लीग, आंतरशालेय क्रिकेटचे (Cricket) सामने रंगतात. याच स्टेडियममध्ये आयपीएल व आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे सामने व्हावेत, यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.

त्यानुसार या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्टस् क्लब (International Sports Club) उभारण्यात येणार आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेने (Thane Municipal Corporation) घेतल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाणेकरांना लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट क्लब उपलब्ध होणार असल्याचे दिसून येत आहे.

Cricket Sports
Satara : 'मविआ'वर टीका करताना शिवसेनेच्या आमदाराची जीभ घसरली; शिंदे म्हणाले, शरद पवार म्हणजे अंगठा..

दादोजी कोंडदेव स्टेडिअमवर ३५ वर्षांपूर्वी १९८६ मध्ये रणजी करंडक सामने झाले होते. त्यानंतर काही कारणास्तव या स्टेडिअमवर स्पर्धात्मक क्रिकेट सामने होऊ शकले नव्हते. या स्टेडियमवर पुन्हा आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने व्हावेत, यासाठी एमसीएच्या सामन्यांसाठी आवश्यक असलेले बदल करण्यात आले. नामवंत क्युरेटर नदिम मेमन यांच्या देखरेखीखाली पालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार केली आहे.

Cricket Sports
Shivrajyabhishek Sohala : रायगड किल्‍ला, पाचाडला छावणीचं स्‍वरूप; गडावर लाठ्या-काठ्या, भाले, शस्‍त्रे घेऊन जाण्यास मनाई

बीसीसीआयच्या नियमावलीनुसार ही खेळपट्टी तयार केल्यामुळे या मैदानावर रणजी क्रिकेट सामने खेळवणे शक्य झाले. दादोजी कोंडदेव स्टेडियम संकुलातील ३८ हजार ४२० चौरस मीटर क्षेत्र विकसित करण्यात आल्याने काही महिन्यांत या क्रीडागृहाने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामन्यांसह आयपीएलचे सामने व्हावेत, यासाठी महापालिकेने हालचाली सुरू आहेत.

Cricket Sports
Shivaji University : पेपरफुटी प्रकरणात विद्यापीठाकडून गंभीर दखल; अहवाल, सीसीटीव्ही फुटेज मागविले

क्रीडा संकुलासाठी भूखंड नियोजित

आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट क्लब; तसेच याच ठिकाणी प्रेस क्लब, व्हीआयपी गॅलरी, बँक्‍वेट, निवासी व्यवस्था, स्विमिंग पूल, जिम्नॅशियम, बिझनेस सेंटर सुविधा आणि या एकत्रित सुविधांचे मुख्य प्रेक्षागृहाशी संलग्नता नसल्याने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने होणे शक्य आहे. ही बाब लक्षात घेवून सर्व सुविधांसह सुसज्ज अशी इमारत क्रीडा प्रेक्षागृहाच्या दक्षिणेकडील जवाहरबाग परिसरात सुमारे ३ हजार चौरस मीटर मोकळ्या भूखंडावर नियोजित करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com