esakal | कोहलीने कवडी मोलात काढलं; त्याला धोनीनं 24 कॅरेट सोनं बनवलं

बोलून बातमी शोधा

Moeen Ali
कोहलीने कवडी मोलात काढलं; त्याला धोनीनं 24 कॅरेट सोनं बनवलं
sakal_logo
By
सुशांत जाधव

आयपीएलच्या 14 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली दमदार कामगिरी करताना दिसतोय. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात मोईन अलीने हंगामातील आणखी एक धमाकेदार इनिंग खेळली. 36 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार खेचत त्याने संघाचा डाव सावरण्यात मोलाचा वाटा उचलला. 6 सामन्यात 200 + धावा आणि 4 विकेट अशी कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडू चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात सामील होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहलीने ज्या खेळाडूला कवडी मोलाच ठरवून संघातून काढून टाकले. त्याला धोनीने आपल्या संघात घेतले.

हेही वाचा: धिप्पाड गेलसमोर काडी पैलवान चहलचा बॉडी बिल्डिंग शो

चेन्‍नई सुपर किंग्जचा (Chennai Superkings) कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याचे खरे मोल ओळखले. मिनी लिलावामध्ये 33 वर्षीय मोईन अलीला चेन्नई सुपर किंग्जने खरेदी केले. मोईन अली त्याच्यावर लावलेला डाव योग्य असल्याचे सिद्ध करणारी कामगिरी करताना दिसतोय. चेन्नईकडून तो सातत्याने वन डाऊनला खेळताना दिसतो. याशिवाय गोलंदाजीमध्येही तो चमक दाखवतोय. त्यामुळेच कोहलीच्या संघाने कवडी मोलात काढलेल्या या गड्याला धोनीने 24 कॅरेट सोन बनवलंय असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: MI विरुद्ध रैनाचा द्विशतकी विक्रम

2018 ते 2020 पर्यंत मोईन अली आरसीबीच्या ताफ्यात होता. 2018 मध्ये त्याला 5 सामन्यात संधी मिळाली. यात त्याने 77 धावा आणि 3 विकेट्स घेतल्या. 2019 च्या हंगामात 11 सामन्यात त्याने 220 धावा केल्या आणि 6 गडी बाद केले. युएईमध्ये रंगलेल्या सामन्यात त्याला केवळ 3 सामन्यात संधी मिळाली. यात त्याने 11 धावा केल्या आणि केवळ एकच विकेट खात्यात जमा करता आली. 2020 च्या हंगामानंतर आरसीबीने त्याला रिलीज केले. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जकडून तो दमदार कामगिरी करताना दिसते.

मोईन अलीची आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी

मोईन अलीने 25 सामन्यात 515 धावा केल्या आहेत. 66 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. यंदाच्या हंगामामध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली तो या कामगिरीत अधिक सुधारणा करेल, असे संकेत मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये 25 सामन्यात (मुंबई विरुद्धच्या गोलंदाजीच्या आकड्यांशिवा.) त्याच्या खात्यात 14 विकेट्स जमा आहेत.