esakal | लांब सिक्सर मारल्यावर बारा रन्सचा स्ट्रोक; टीवटीवमुळं माजी क्रिकेटर ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket

लांब सिक्सर मारल्यावर बारा रन्सचा स्ट्रोक; टीवटीवमुळं माजी क्रिकेटर ट्रोल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

इंग्लंडचा माजी क्रिकेटर आणि यंदाच्या हंगामात आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या केविन पीटरसन याने नव्या नियमासंदर्भात मत मांडले आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचा (England Cricket Team) माजी क्रिकेटर केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने ट्विटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड (ICC) आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (England cricket board) छोट्या फॉर्मेटमधील गेममध्ये मोठा बदल करण्यासंदर्भात सल्ला दिलाय. केविन पीटरसन याने एक ट्विट केलंय. त्यात त्याने लिहिलंय की, टी 20 क्रिकेटमध्ये एक नियम करण्याची गरज वाटते. इंग्लंड क्रिकेट बोर्ड देखील 'द हंड्रेड' टूर्नामेंटमध्ये नव्या नियम लागू करण्याबाबत विचार करु शकते. जर एखाद्या फलंदाजाने 100 मीटर लांब षटकार मारला तर 6 रन्स ऐवजी या फटक्यावर 12 रन्स मिळायला हव्या. केविन पीटरसनच्या नव्या नियमासंदर्भातील ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचे ट्विट व्हायरल होत असून काहीजण पीटरसनला ट्विटही करत आहेत.

हेही वाचा: IPL 2021 : ऑसी खेळाडूंसंदर्भात PM म्हणाले; तुमचं तुम्ही बघा!

टी 20 क्रिकेटमधील थरार वाढवण्यासाठी अनेक नवे नियम लागू करण्यात आले आहेत. यात बदलही होत असतो. काही नियम लागू करुन ते कॅन्सलही झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. त्यात आता पीटरसनने आणखी एक नवा नियम ट्राय करुन पाहायला सांगितला आहे. केविन पीटरसनच्या या ट्विटवर क्रिकेट चाहत्यांसह अनेक माजी खेळाडूंनीही प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्ट्रेलिया के दिग्गज खेळाडू आणि कोच डॅरेन लेहमन यांनी हसण्याची इमोजी शेअर केली आहे. डॅरेन गौफ यांनीही हा नियम पटण्याजोगा नाही असे मत व्यक्त केले आहे.

नेटकऱ्यांनी पीटरसनच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना त्याची शाळा घेतल्याचे दिसते. मी केकेआरची चाहती असून टीमने एक विकेट घेतल्यानंतर दोन विकेट द्यावे, असा नियम करावा, अशी सूचना करत पीटरसनची मजाक घेतली आहे. एका नेटकऱ्याने रिव्हर्स स्विप सिक्सर मारल्यावर किती रन्स द्यायच्या? असा प्रश्न उपस्थितीत केलाय. आणखी एका नेटकऱ्याने गोलंदाजाने 150 पेक्षा अधिक गतीने चेंडू टाकल्यास त्याला दोन विकेट द्यावे, असे म्हटले आहे.

loading image