esakal | KKR टीम 7 दिवस क्वारंटाईन; MIvsSRH लढत ठरल्याप्रमाणेच होणार
sakal

बोलून बातमी शोधा

KKR टीम 7 दिवस क्वारंटाईन; MIvsSRH लढत ठरल्याप्रमाणेच होणार

KKR टीम 7 दिवस क्वारंटाईन; MIvsSRH लढत ठरल्याप्रमाणेच होणार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघातील काही खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीएल स्पर्धेच काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोलकाता आणि बंगळुरु यांच्यातील सामना स्थगित करण्यात आल्यानंतर स्पर्धेतील इतर सामन्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. आयपीएल गव्हर्निंग कमिटीने स्पर्धेसंदर्भात मोठी अपडेट्स दिलीये. कोलकाता आणि चेन्नईच्या संघातील सदस्यांचा कोरोना रिपोरिट पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग कमिटीची एक बैठक झाली. या बैठकीनंतर स्पर्धेतील पुढील सामन्यासंदर्भात माहिती देण्यात आलीये.

हेही वाचा: IPL 2021 : स्पर्धा संकटात; बायोबबलमध्ये कोरोना आला कसा?

आयपीएल गव्हर्निंग कमिटीने दिलेल्या माहितीनुसार, केकेआरची संपूर्म टीम 7 दिवस क्वारंटाईन असेल. त्यामुळे पुढील सात दिवसांत त्यांचा एकही सामना होणार नाही. मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स यांच्यातील सामना आणि इतर सामने वेळापत्रकानुसारच होईल, अशी माहितीही आयपीएलच्या गव्हर्निंग कमिटीने दिलीये. त्यामुळे आयपीएलच्या बायोबबलमध्ये असणाऱ्या खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतरही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यावर आयोजक ठाम असल्याचे दिसते. कोलकाता नाईट राइडर्स (KKR) चा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे लोक टीमच्या इतर सदस्यांच्या संपर्कात असल्यामुळे टीमवर क्वारंटाईनची वेळ आली आहे.

हेही वाचा: IPL 2021: आजचा बंगळुरू-कोलकाता सामना रद्द!

सीएसकेच्या ताफ्यातही कोरोनाचा शिरकाव

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या ताफ्यातील तीन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त सोमवारी समोर आले होते. यात सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, बॉलिंग कोच एल बालाजी आणि बस क्लीनरच्या रिपोर्टचा समावेश होता. टीममधील इतर सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली होती.

काय आहे आयपीएल कोविड-19 ची नियमावली

आयपीएलच्या नियमावलीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला 6 दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाते. यात पहिल्या दिवशीची कोरोना टेस्ट आणि त्यानंतर सहव्या दिवशी होणारी कोरोना टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच त्याला बायोबबलमध्ये असलेल्या संघाला जॉईन होता येते.

loading image