esakal | IPL 2021,PBKS vs SRH Live: पंजाब ऑल आउट; हैदराबादसमोर 121 धावांचे टार्गेट

बोलून बातमी शोधा

Jonny Bairstow and David Warner
PBKS vs SRH: पंजाबसमोर हैदराबादचा भांगडा
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

IPL 2021, PBKS vs SRH : जॉनी बेयरस्टोचे नाबाद अर्धशतक 63(56) आणि केन विलियम्सनच्या नाबाद 16 (19) धावांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने पंजाबला 9 विकेट राखून पराभूत केले. कर्णधार डेविड वॉर्नरने 37 चेंडूत 37 धावा केल्या. फेबिनने त्याची विकेट घेतली. तो परतल्यानंतर जॉनी-केन जोडीने 19 व्या षटकात संघाला विजय मिळवून दिला. स्पर्धेतील त्यांचा हा पहिला विजय ठरला. फेबिन वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला छाप सोडता आली नाही. तत्पूर्वी खलिद अहमदचा भेदक मारा, त्याला अभिषेक शर्मा आणि इतर गोलंदाजांनी दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जच्या संघाला 120 धावांत ऑल आउट केले. पंजाब संघाचा कर्णधार लोकेश राहुल याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. तो 6 चेंडूत 4 धावांची भर घालून चालता झाला. भुवीने त्याची विकेट घेतली. मयांक अग्रवाल 22 धावा करुन बाद झाला. खलील अहमदने त्याला राशीद खानकरवी झेलबाद केले. त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या राशीद खानने गेलला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

हेही वाचा: IPL 2021: SRH वाल्यांनी नेटकऱ्यांच ऐकलं; पांड्येजीच्या जागी केदार भाऊला संधी

गेलने 17 चेंडूत 15 धावा केल्या. निकोलस पूरनला वॉर्नरने अप्रतिम थ्रोवर शून्यावर बाद केले. आघाडीचे गडी स्वस्तात आटोपल्यानंतर शाहरुख खानने झुंज देण्याचा प्रयत्न केला पण तो 22 धावांचीच भर घालू शकला. खलीलनेच त्याची विकेट घेतली. दीपक हुड्डाच्या 13 आणि हेन्रीक्सच्या 14 धावा वगळता तळातील फलंदाजीत कोणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. पंजाबचा संघ 19.4 ओव्हरमध्ये 120 धावांत ऑल आउट झाला. हैदराबादकडून अहमद खलीलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. अभिषेक शर्माला दोन गडी बाद करण्यात यश आले. भुवी सिद्धार्थ कौल आणि राशीद यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. तर पंजाबचे दोन गडी रन आउटच्या स्वरुपात बाद झाले.

 • 73-1 : 37 चेंडूत 37 धावा करुन वॉर्नर परतला, फॅबिन एलेनला मिळाले यश

 • बेयरस्टो आणि वॉर्नर जोडीने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली

 • 120-10 : मोहम्मद शमी 3 धावा करुन झाला रन आउट, हैदराबादसमोर 121 धावांचे आव्हान

 • 114-9 : मुर्गन अश्विनने संघाच्या धावसंख्येत घातली 9 धावांची भर, सिद्धार्थ कौलने त्याला बेयरस्टोकरवी केलं कॅच आउट

 • 110-8 : लयीत दिसणाऱ्या शाहरुखची खलीदनं घेतली विकेट, त्याने 17 चेंडूत 22 धावा केल्या

 • 101-7 : फेबिन एलन 6 धावांवर झाला खलिदचा शिकार

82-6 : अभिषेक शर्माने हेन्रिक्सला 14 धावांवर धाडले माघारी

 • 63-5 : दिपक हुड्डाही 11 चेंडूत 13 धावा करुन परतला, अभिषेक शर्माला मिळाले यश

 • 47-4 : राशीद खानने घेतली क्रिस गेलची विकेट, त्याने 17 चेंडूत 15 धावा केल्या

 • 39-3 : वॉर्नरने डायरेक्ट हिट करत निकोलस पूरनला केलं रन आउट, त्याला खातेही उघडता आले नाही.

 • 39-2 : मयांक अग्रवालच्या रुपात पंजाबला दुसरा धक्का, खलील अहमदने घेतली विकेट

img

mayank agarwal

 • 15-1 : भुवनेश्वर कुमारने हैदराबादला दिला पहिला धक्का, केएल राहुल केदार जाधवकडे कॅच देऊन स्वस्तात परतला माघारी

 • पजांब किंग्जचा कर्णधार लोकेश राहुलने टॉस जिंकला, पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय