esakal | आयुष्यातला सर्वात रोमहर्षक T20 सामना, रोहितचा धोनीला चिमटा
sakal

बोलून बातमी शोधा

MIvsCSK

आयुष्यातला सर्वात रोमहर्षक T20 सामना, रोहितचा धोनीला चिमटा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 27 व्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स (MI) आणि महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात अपेक्षेप्रमाणे रंगतदार सामना पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्ससाठी खेळायलाच जन्माला आलाय, असे वाटणाऱ्या कॅरेबियन अष्टपैलू कायरन पोलार्डने मुंबईच्या विजायात मोलाचा वाटा उचलला. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळी करत पोलार्डने अखेरच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला.

हेही वाचा: IPL 2021:पोलार्डने तुफान फटकेबाजीसह नोंदवली फास्टर फिफ्टी!

कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने टॉस जिंकून चेस करण्याचा निर्णय घेतला होता. स्वत: क्विंटन डिकॉकच्या साथीने मुंबईच्या डावाला आक्रमक सुरुवात करुन दिली. उरली सुरली कसर कायरन पोलार्डने भरून काढली. मुंबईने चेस करताना पहिल्यांदाच दोनशेहून अधिक धावा करुन दाखवल्या. संघाला पाच वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्मासाठी हा सामना खूप रोमहर्षक वाटतो. मॅचनंतर त्याने ही गोष्ट बालून दाखवली. रोहित म्हणाला की, माझ्या आयुष्यातील हा सर्वात रोमहर्षक सामना होता. पोलार्डची खेळी अभूतपूर्व होती. पिच गोलंदाजीसाठी हितकारक नाही. फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी असल्यामुळे चेस करण्याचा निर्णय घेतला. 20 ओव्हर खेळलो तर आम्ही जिंकू, असा विश्वास होता, असे रोहित शर्माने म्हटले. आयुष्यातील सर्वात रोमहर्षक सामना अनुभवल्याचे सांगत रोहितने धोनीला चिमटाच घेतलाय, असे वाटते. सामन्यानंतर धोनीनेही मुंबई इंडियन्सची फिरकी घेतली होती. पराभूत झालो असलो तरी आम्ही पाँइंट टेबलमध्ये टॉपर आहोत, यावर धोनीने भर दिल्याचे पाहायला मिळाले होते.

हेही वाचा: IPL Record : एका सीझनमध्ये 4 वेळा झिरोवर बाद झालेले 5 हिरो!

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढत ही नेहमीच संघर्षमय होते. पुन्हा एकदा या दोन्ही संघात थरार पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपदाचा विक्रम रचला असून त्याच्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्जचा नंबर लागतो. त्यांनी तीन वेळा जेतेपद पटकावले आहे. आयपीएलध्ये दोन्ही संघातील लढतीचा इतिहास हा मुंबई इंडियन्सचे पारडे जड असल्याचे दाखवणारा आहे. दोन्ही संघात 31 सामने झाले असून मुंबईने 19 तर चेन्नईने 12 सामन्यात विजय मिळवलाय. शनिवारी दिल्लीच्या मैदानात रंगलेला सामना हा सर्वाधिक धावसंख्येचा सामना होता.

loading image