esakal | MIvsPBKS लढतीपूर्वी रंगला बुमराह-संजना यांच्यातील प्रेमाचा सामना

बोलून बातमी शोधा

Sanjana Ganesan and Jasprit Bumrah
MIvsPBKS लढतीपूर्वी रंगला बुमराह-संजना यांच्यातील प्रेमाचा सामना
sakal_logo
By
टीम ई सकाळ

आयपीएलच्या 14 व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ शुक्रवारी चेन्नईच्या मैदानातील अखेरचा सामना पंजाब विरुद्ध खेळणार आहे. या मैदानातील विजयासह जेतेपदाची दावेदारी भक्कम करुन मुंबई इंडियन्सचा ताफा उर्वरित सामन्यांसाठी दिल्लीला कूच करण्यास उत्सुक असेल. चेपॉकच्या मैदानातील सामन्यापूर्वी सोशल मीडियाव मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) आणि त्याची पत्नी आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन (Sanjana Ganesan) यांच्यातील प्रेमाची चर्चा सोशल मीडियावर रंगलीये.

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिने एक सुंदर फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलाय. या फोटोवर जसप्रित बुमराहने लव्ह इमोजीच्या माध्यमातून रिअ‍ॅक्शन दिलीये. सोशल मीडियावर या फोटोसह रिअ‍ॅक्शनवर चांगलीच चर्चा सुरु असून या दोघांचे चाहत्ये या फोटोला मोठ्या प्रमाणात पसंती देताना दिसते.

img

sanjana

हेही वाचा: IPL 2021: विराट म्हणाला, स्ट्राईक देतो आधी सेंच्युरी कर! Video

15 मार्च 2021 रोजी या जोडीने आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात झाली होती. लग्नानंतर दोघही आपापल्या कामावर रुजू झाल्याचे पाहायला मिळाले होते. 9 एप्रिलला मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात क्रिकेटच्या मैदानात कमबॅक केले. याच सामन्यावेळी संजना टेलिव्हिजनवर अँकरिंग करताना दिसली होती.

img

Bumrah and Sanjana

हेही वाचा: IPL 2021 : पडिक्कलची 'रॉयल' खेळी; IPL मधील पहिली सेंच्युरी

लग्नाला एक महिना झाल्यानंतर जसप्रीत बुमराहने संजनासोबतची एक खास पोटो शेअर केला होता. सर्वात चांगल्या मैत्रीणीसोबत लग्नाला एक महिना झाला, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले होते. संजनाने ही बुमराहसोबत केक कटिंग करतानाचा फोटो शेअर केला होता. यात तिने केक आणि स्वीट हबीला मिस करतेय, असा उल्लेख केला होता. आयपीएलमध्ये जसप्रित बुमराहा मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करतो. दुसरीकडे संडना स्टार स्पोर्ट्ससाठी अँकरिंग करताना दिसते. यापूर्वी ती केकेआर डायरिज हा शो होस्ट करताना देखील पाहायला मिळाले होते.