मँचेस्टर युनायटेड खेळणार क्रिकेट? आयपीएल संघ खरेदी करणार!

IPL Cricket
IPL CricketIPL Cricket

मुंबई : आयपीएलची लोकप्रियता चांगलीच वाढलेली आहे. यावर मोठ्या प्रमाणात पैसा लावला जातो. चेन्नई सुपर किग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघातील सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकप्रियता पाहूनच बीसीसीआयने २०२२ च्या आयपीएसमध्ये आणखी दोन संघाचा समावेश करणार असल्याची घोषणा केली आहे. मँचेस्टर युनायटेड एक संघ खरेदी करण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

आयपीएल केवळ भारताताच नव्हे तर विदेशातही चांगलाच लोकप्रिय झाला आहे. यामुळेच पुढच्या सीझनमध्ये आठ ऐवजी दहा संघ आयपीएल खेळताना आपल्याला दिसून येणार आहे. दोन अतिरिक्त संघ वाढणार असल्याने पुढच्या लिलावात मोठ्या प्रमाणात खेळाडूंची अदलाबदल होऊ शकते. यामुळे प्रत्येक संघाला नव्याने आपला संघ तयार करावा लगणार आहे.

IPL Cricket
पाकिस्तानमध्ये पराभवानंतर बळीचा बकरा शोधणे सामान्य बाब

आयपीएलमध्ये दोन टीम वाढणार असल्याने अनेक मोठे व्यक्ती खरेदीसाठी तयार असल्याचे बोलले जात आहे. या लिस्टमध्ये मँचेस्टर युनायटेडचे नाव देखील घेतले जात आहे. इंग्लंडचा सुप्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडच्या मालकांनी संघ खरेदी करण्यासाठी उत्साह दाखवला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २१ सप्टेंबर रोजी आयपीएल संघांसाठी निविदा प्रक्रियेची तारीख वाढवत असल्याचे कारण दिले आहे. मँचेस्टर युनायटेडच्या मालकांनी आयपीएलमध्ये संघ खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. बीसीसीआयने निविदा खरेदी करण्याची तारीख वाढवण्याचे हे देखील एक कारण असू शकते, असे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सूत्राने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com