
"मी तुझ्यासोबत बॅटिंग करु शकत नाही"; Maxwell विराटला असं का म्हणाला?
IPL 2022: आयपीएलच्या हंगामातील सामने मुंबई पुण्यात सुरू असून दोन दिवसांपूर्वी पुण्यात RCB आणि CSK यांच्यादरम्यान सामना खेळवला गेला. त्या सामन्यात बंगळूर संघाचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) हा विराटसोबत फलंदाजी करत असताना रन आऊट झाला होता. त्यानंतर "मी तुझ्यासोबत फलंदाजी करु शकत नाही." असं तो त्याला म्हणाला आहे.
(IPL 2022 CSK vs RCB)
परवा पुण्यात चेन्नई आणि बंगळूर यांच्यात झालेल्या सामन्यात बंगळूरने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७३ रन बनवले होते. त्यांच्या धावाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ २० षटकात फक्त १६० धावा बनवू शकला होता. त्यामुळे या सामन्यात बंगळूरचा विजय झाला आहे. पण प्रथम फलंदाजी करताना नवव्या षटकात स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याला रन आऊट होऊन तंबूत जावं लागलं होतं त्यावरुन ग्लेन मॅक्सवेलने नाराजी व्यक्त केली आहे.
(Glenn Maxwell vs Virat Kohli)
हेही वाचा: असं वाटतंय की इंग्रज बरे होते - संजय राऊत
दरम्यान सामन्यातील नववं षटक सुरू असताना कोहली एका चेंडूवर धाव घेण्यासाठी धावला पण तेवढ्या वेळेत मॅक्सवेल क्रीजपर्यंत पोहचू शकला नाही, त्यामुळे त्याला रनआऊट व्हावं लागलं होतं. त्यानंतर त्याच्या अगोदर १६ एप्रिलला दिल्लीसोबत झालेल्या सामन्यात कोहलीने याच प्रकारे एका धावेसाठी प्रयत्न केला होता पण मॅक्सवेलने त्याला थांबवलं आणि कोहलीला तंबूत परतावं लागलं होतं.
चेन्नईसोबतच्या सामन्यात झालेल्या रनआऊटवरुन मॅक्सवेल विराटला चेष्टेत म्हणाला की, "तू खूप फास्ट धावतो म्हणून मी तुझ्यासोबत फलांदाजी करु शकणार नाही." अशी चेष्टा प्रत्येक संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये होत असते.
Web Title: Ipl 2022 Rcb Vs Csk Maxwell And Virat Kohali Batting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..