IPL 2023 : IPL सामने आता होणार 4K; बीसीसीआयने दिली परवानगी

IPL 2023 LIVE 4K Streaming
IPL 2023 LIVE 4K Streamingesakal

IPL 2023 LIVE 4K Streaming : आयपीएल 2023 च्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला आहे. मार्च किंवा एप्रिल महिन्यात आयपीएलच्या हंगामाला सुरूवात होणार आहे. आता बीसीसीआयने आपल्या टेलिव्हिजन प्रेक्षकांसाठी चांगली सुविधा निर्माण करण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने जियोच्या नेतृत्वातील स्पोर्ट्स 18 ला 4K व्हिडिओ फॉरमॅटमध्ये आयपीएल 2023 चे प्रसारण करण्याची परवानगी दिली आहे.

IPL 2023 LIVE 4K Streaming
Shubman Gill : गालावर पडते खळी, त्यावर शतकी खेळी; भाऊ टिंडरवरही डिमांडमध्ये

4K व्हिडिओ फॉरमॅट हा HD 1080p व्हिडिओ पेक्षा चांगल्या दर्जाचे असतात. यामुळे चाहत्यांना आयपीएलचा एक वेगळा आणि उच्च दर्जाचा अनुभव घेता येणार आहे. 2022 मध्ये हॉटस्टार हा आयपीएलचा अधिकृत डिजीटल पार्टनर होता. मात्र हॉटस्टार आयपीएलचे फक्त एचडी प्रसारणच करत होता. आता जियो 4K रिजॉल्यूशन सुविधा देणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

एका रिपोर्ट नुसार जियोने फिफा वर्ल्डकपमध्ये 4k सुविधा दिल्याचा दावा केला आहे. मात्र एका वरिष्ठ मीडिया स्ट्रॅटेजिस्टने सांगितले की, 'फिफा हा जियोसाठी एक शिकण्याचा प्रकल्प होता. त्यांनी गेल्या दोन महिन्यात आपल्या तांत्रिक क्षमतेत वृद्धी करण्यासाठी काम केले. आता ते आयपीएलदरम्यान ते एक उच्च गुणवत्तेचा अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहेत.'

IPL 2023 LIVE 4K Streaming
Jofra Archer: विकेटचा षटकार! MI च्या वाघाने केली अर्धा आफ्रिकन संघाची शिकार

यंदा आयपीएल भारतात 16 ते 17 भाषांमध्ये लाईव्ह स्ट्रीम होणार आहे. यात बंगाली, तमिळ, तेलुगू आणि ओडिसा या भाषांचा देखील समावेश आहे. यामुळे भारताच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या लोकांना भाषेची कोणती तक्रार राहणार नाही.

(Sports Latest News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com