IPL 2023 RCB : आरसीबीच्या संघात मोठा बदल! न्यूझीलंडच्या खतरनाक ऑलराउंडरची झाली एन्ट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2023 RCB Rope in Michael Bracewell as Injured Will Jacks Replacement

IPL 2023 RCB : आरसीबीच्या संघात मोठा बदल! न्यूझीलंडच्या खतरनाक ऑलराउंडरची झाली एन्ट्री

IPL 2023 RCB : आयपीएल 2023 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत, मात्र त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात बदल केले आहेत. विल जॅक दुखापतीमुळे स्पर्धेच्या सुरुवातीच्या अगोदर स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्यामुळे न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेल त्याच्या जागी आला होता. ब्रेसवेलने अलीकडेच भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बॅट आणि बॉलने खतरनाक कामगिरी केली होती.

इंग्लंडचा विल जॅक्स नुकताच बांगलादेश दौऱ्यावर जखमी झाला होता. आरसीबीने लिलावात 3.2 कोटी रुपये खर्च करून त्याला आपल्या संघात समाविष्ट केले. जॅक्सच्या बाहेर पडल्यानंतर आता आरसीबीने मायकेल ब्रेसवेलला 1 कोटीच्या मूळ किमतीत आपल्या संघात समाविष्ट केले आहे. ब्रेसवेलने भारत दौऱ्यावर 140 धावांची धडाकेबाज खेळी करून सर्व फ्रँचायझींचे लक्ष वेधून घेतले होते.

ब्रेसवेलने आतापर्यंत 117 टी-20 सामने खेळले असून 133.48 च्या प्रभावी स्ट्राइक रेटने 2284 धावा केल्या आहेत, ज्यात 1 शतक आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. ब्रेसवेलने या कालावधीत 40 विकेट्सही घेतल्या आहेत, त्यापैकी 21 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात आल्या आहेत.

ब्रेसवेल सध्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंड संघाचा भाग आहे. पाहुण्यांविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीही त्याची निवड झाली आहे, परंतु आयपीएलमध्ये त्याची निवड झाल्यानंतर तो ही मालिका खेळू शकणार नाही आणि न्यूझीलंड क्रिकेट त्याला कसोटी मालिकेनंतरच सोडणार आहे. त्याच्या जागी रचिन रवींद्रची वनडे संघात निवड करण्यात आली आहे.

RCB 2 एप्रिलला 5 वेळच्‍या चॅम्पियन मुंबई इंडियन्‍सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.