IPL 2026 Auction Big Twist
esakal
आयपीएल ऑक्शनपूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनला फक्त फलंदाज म्हणून नोंदणीकृत करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत ग्रीनने स्पष्टीकरणही दिलं आहे. आगामी आयपीएलमध्ये आपण गोलंदाजीसुद्धा करणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत.