IPL 2026 Auction Date Announced
esakal
आयपीएलमधील सर्व संघांनी त्यांच्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर आता बीसीसीआयने मिनी ऑक्शनची तारीख आणि ठिकाण जाहीर केले आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, IPL 2026 मिनी ऑक्शन येत्या 16 डिसेंबर रोजी अबू धाबीतील एतिहाद अरेना येथे होणार आहे. या ऑक्शनकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.