RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Praful Hinge First Over: इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या २१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करताना वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगेने इतिहास रचला आहे.
Praful Hinge First Over

Praful Hinge First Over

ESakal

Updated on

पहिल्याच षटकात तीन बळी आणि दुसऱ्याच चेंडूवर वैभव सूर्यवंशीची विकेट... एका गोलंदाजासाठी यापेक्षा शानदार पदार्पण काय असू शकते... आज प्रफुल्ल हिंगेसोबत ते सर्व घडले, ज्याची त्याने क्वचितच कल्पना केली होती. सनरायझर्स हैदराबादचा २४ वर्षीय वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगेने आयपीएल २०२६ च्या २१ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिल्याच षटकात इतिहास रचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com