IPL franchise sale Latest News : कुणी संघ विकत घेत का?, 'RCB' नंतर 'आयपीएल'मधील आणखी एक संघ विक्रिला!

IPL Latest Update : लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांचे बंधू हर्ष गोयंका यांनी सोशल मीडिया केलेल्या पोस्टमुळे खळबळ उडाली
Harsh Goenka shares social-media post announcing possible sale of Rajasthan Royals ahead of IPL 2026.

Harsh Goenka shares social-media post announcing possible sale of Rajasthan Royals ahead of IPL 2026.

Sakal

Updated on

Harsh Goenka announcement about IPL franchise sale : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पुढील हंगामासाठीची लिलाव प्रक्रिया फार दूर नाही. काही दिवसांत, सर्व फ्रँचायझी त्यांचे संघ तयार करण्यास सुरुवात करतील. पण त्यापूर्वी, एक गोष्ट जवळजवळ निश्चित आहे.  या स्पर्धेतील गतविजेता संघ म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझीची विक्री होणार आहे.  याशिवाय हाती आलेल्या माहितीनुसार आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार आणखी एक फ्रँचायझी देखील विक्रीसाठी आहे.

प्राप्त माहितीनुसार आयपीएल लिलाव १६ डिसेंबर रोजी होण्याची अपेक्षा आहे. या लिलावापूर्वी, लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांचे बंधू हर्ष गोयंका यांनी सोशल मीडिया केलेल्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी आणखी एक फ्रँचायझी विक्रीसाठी असल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात हर्ष यांनी एक्स वर केलेल्य पोस्टमध्ये म्हटले आहे की, वर्ष २००८मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकवणारे राजस्थान रॉयल्स देखील विक्रीसाठी तयार आहे. सध्या तरी  फ्रँचायझी रॉयल स्पोर्ट्स ग्रुपच्या मालकीची आहे, ज्यांच्याकडे फ्रँचायझीचा ६५ टक्के हिस्सा आहे. तर याशिवाय, लचलन मर्डोक आणि रेडबर्ड कॅपिटल पार्टनर्सकडे काही हिस्सा  आहे

हर्ष गोयंका यांनी नेमकं काय म्हटलंय? –

हर्ष गोयंका यांनी म्हटलय की, मी ऐकलंय, एक नाही तर दोन आयपीएल संघ विक्रीसाठी तयार आहेत. आरसीबी आणि आरआर. हे स्पष्टपणे समजतय की लोक मोठ्या व्हॅल्यूएशनचा फायदा उचलण्याच्या विचारात आहेत. तर दोन संघ विक्रीसाठी आहेत आणि चार किंव  पाच संभाव्य खरेदीदार आहेत. या फ्रँचायझींची कोण  खरेदी करेल? ते पुणे, अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू किंवा अमेरिकेतून असतील?

Harsh Goenka shares social-media post announcing possible sale of Rajasthan Royals ahead of IPL 2026.
Leopard Safety Tips : अचानक बिबट्या दिसला तर काय करायचं..? ; सुरक्षित राहण्यासाठी पाळा वनविभागाच्या 'या' सूचना

प्राप्त माहितीनुसार, युनायटेड स्पिरिपट्स लिमिटेडची मूळ कंपनी असणारी डिएगो आरसीबीला विकत घेण्यास इच्छुक आहे. आरसीबीच्या विक्रीसाठीची औपचारिकता ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

राजस्थान रॉयल्स बोलायचे झाले तर, आयपीएल २०२६च्या आधी संघात अनेक मोठे बदल झाले आहेत. राहुल द्रविड हे आता राजस्थान रॉयल्सचे कोच नसतील. २०२६च्या सीझनसाठी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी कुमार संगाकारा सांभाळणार आहेत. तसेच, टीमने आपला कर्णधार राहिलेल्या संजू सॅमसनला चेन्नई सुपर किंग्जसोबत ट्रेड केलंय, त्याच्या जागी रवींद्र जडेजा आणि सॅम कर्रन आता राजस्थानच्या टीममध्ये आले आहेत. राजस्थान रॉयल्सने लिलावाआधी एकूण १६ खेळाडूंना रिटेन केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com